अतिवृष्टीचे अनुदान वाटप नाही ; दिंद्रुड महाराष्ट्र ग्रामीण बॅंकेतील प्रकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:27 AM2020-12-25T04:27:12+5:302020-12-25T04:27:12+5:30
माजलगाव मतदारसंघात दिंद्रूडजवळ असलेल्या फकीरजवळा येथील शेतकरी जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झाले. त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात ...
माजलगाव मतदारसंघात दिंद्रूडजवळ असलेल्या फकीरजवळा येथील शेतकरी जून ते ऑक्टोबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित झाले. त्यांच्या शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यामुळे शासनाने अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना ३३ टक्के अनुदान जाहीर केले. तात्काळ शेतकऱ्यांना खात्यावर पैसे वर्ग करावेत, अशा सूचना दिल्या होत्या. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी तहसीलदार यांनी प्रत्येक बँकेस रक्कम पाठविली. मात्र, बँक अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभारामुळे तब्बल एक महिना उलटून गेला तरी वाटपच केले नाही. शेतकरी दररोज या शाखेत चकरा मारतात. परंतु, त्यांना परत पाठविले जाते. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट जिल्ह्याच्या पालक सचिव विनिता सिंघल यांच्याकडे तक्रार दाखल केली. सिंघल यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रकरण सोपविले आहे. दरम्यान, शासनाने पैसे देऊनही शेतकऱ्यांना वेठीस धरणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.