अतिवृष्टीमुळे हातचे पिक गेले; नैराश्यात तरुण शेतकऱ्याने स्वतःला संपवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2021 06:18 PM2021-10-19T18:18:35+5:302021-10-19T18:19:12+5:30
अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके माती सह वाहून गेले
केज ( बीड ) : अतिवृष्टीमुळे शेतातील सोयाबीन पिकाचे झालेल्या नुकसानीमुळे खचून जात एका २८ वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. तालुक्यातील साळेगाव येथे ही घटना घडली.
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतात पाणीच पाणी झाल्याने पिके माती सह वाहून गेल्याने शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतात केलेला खर्च यामुळे आर्थिक संकटात शेतकरी सापडला आहे. तालुक्यातील साळेगाव येथील बालासाहेब रामलिंग गीते हा तरुण शेतकरी या नुकसानीमुळे नैराश्यात होता. यातूनच आज सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास लवण शिवारातील लिंबाच्या झाडाला त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. माहिती मिळताच केज पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक अशोक गवळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याच्या पश्चात पत्नी कोमल ( २४ ) व आदित्य (६ ) व अंजली ( ४) असा परिवार आहे.