धरण क्षेत्रात मुरुमाचा बेसुमार उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:02+5:302021-07-19T04:22:02+5:30

माजलगाव : तालुक्यात एक-दोन ठिकाणी परवाना घेऊन अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा उपसा करण्यात येत आहे. महसूल अधिका-यांना ...

Excessive uptake of pimples in the dam area | धरण क्षेत्रात मुरुमाचा बेसुमार उपसा

धरण क्षेत्रात मुरुमाचा बेसुमार उपसा

Next

माजलगाव : तालुक्यात एक-दोन ठिकाणी परवाना घेऊन अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मुरुमाचा उपसा करण्यात येत आहे. महसूल अधिका-यांना हाताशी धरून माजलगाव धरण परिसरात एका गटाचा परवाना घेऊन अनेक गटांतून शेकडो ब्रास मुरुमाचा उपसा अवैध पद्धतीने सुरू असताना महसूल प्रशासन मात्र मूग गिळून गप्प आहे.

माजलगाव तालुक्यात गौण खनिजांचा साठा मुबलक प्रमाणात आहे. त्यामुळे अवैधरीत्या गौण खनिज उपसा करणारेदेखील अनेक आहेत. या ठिकाणी महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून छोट्यामोठ्या स्वरूपाचा परवाना घेऊन माजलगाव धरणाच्या इतर क्षेत्रांतून हजारो ब्रास गौण खनिजाचा उपसा दिवसरात्र सुरू आहे. धरण क्षेत्रात एका गटाचा परवाना घेऊन सोयीनुसार चांगला व जवळचा मुरूम दुसऱ्या गटातून सर्रास उपसा केला जात आहे. रविवारी धरण क्षेत्रात एका गटाची परवानगी घेऊन अनेक ठिकाणी जेसीबीच्या साह्याने मुरूम उपसा करून अनेक वाहने या ठिकाणाहून भरून घेऊन जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते. अशा प्रकारामुळे येथील महसूल प्रशासनास मोठ्या प्रमाणात वरकमाई मिळत असल्याचे येथील कर्मचारी सांगतात. यामुळे शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडवण्यास येथील कर्मचारी सहकार्य करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

--------

मुरूम उपसा करण्यासाठी महसूलकडून ५० ते १०० ब्रास मुरुमाचा परवाना काढण्यात येतो. हा मुरूम केवळ एकाच दिवसात घेऊन जाता येतो. परंतु, याच परवान्यावर एक ते दोन आठवडे हजारो ब्रास मुरूम उपसण्यात येतो. या ठिकाणी देखरेखीसाठी महसूल विभागामार्फत कोणताही कर्मचारी ठेवण्यात येत नसल्याने गौण खनिजाचा मनाला येईन तेवढा उपसा होत आहे.

--------

धरणाच्या बाजूला केवळ एका गटाची परवानगी महसूल विभागाकडून देण्यात आली आहे. परवानगी दिलेल्या गटाव्यतिरिक्त जर इतरत्र ठिकाणावरून मुरुमाचा उपसा होत असेल, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

-- वैशाली पाटील,

तहसीलदार

----------------

180721\purusttam karva_img-20210718-wa0021_14.jpg

Web Title: Excessive uptake of pimples in the dam area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.