रासायनिक खतांचा अतिवापर धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:36 AM2021-09-26T04:36:07+5:302021-09-26T04:36:07+5:30
------------------------------ रात्री उशिरापर्यंत चालतात व्यवसाय अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवानगीही आहे. मात्र, शहरातील काही ...
------------------------------
रात्री उशिरापर्यंत चालतात व्यवसाय
अंबाजोगाई : कोरोना संकटामुळे रात्री १० वाजेपर्यंत व्यवसाय करण्यासाठी परवानगीही आहे. मात्र, शहरातील काही परिसरामध्ये काही व्यावसायिक रात्री उशिरापर्यंत आपली दुकाने उघडी ठेवत आहेत. यामुळे गुन्हेगारी वाढत आहे. तरी याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
--------------------------
अंबाजोगाई शहरात अतिक्रमण वाढले
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध मार्गांवर दुकानदार व काही नागरिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने सदर अतिक्रमण हटवून दिलासा द्यावा, अशी मागणी पुढे आली आहे.
-----------------------------
वाढत्या महागाईने नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने महागाई वाढत आहे. त्यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीस आले आहेत. महागाई कमी करून दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पेट्रोल, डिझेलचे भावही सातत्याने वाढत आहेत. कोरोना संकटामुळे प्रत्येक जण संकटात असतानाही महागाईमुळे अनेकांच्या अडचणी वाढल्या आहेत.
-----------------------
शहरातील अनधिकृत फलक हटवावे
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील विविध चौकांमध्ये अनधिकृत फलक लावण्यात आले असून यामुळे शहराच्या सौंदर्यात बाधा निर्माण झाली आहे. बॅनर लावण्यासाठी कसलीही परवानगी न घेता हे फलक लावले जात आहेत. याकडे नगर परिषद प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.