खळबळजनक ! अंबाजोगाई जिल्हा न्यायालयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:17 PM2018-02-08T13:17:05+5:302018-02-08T13:33:23+5:30

जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

Excited! The Strong Room of Ambajogai District Court was thieved by thieves | खळबळजनक ! अंबाजोगाई जिल्हा न्यायालयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी फोडली

खळबळजनक ! अंबाजोगाई जिल्हा न्यायालयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी फोडली

googlenewsNext
ठळक मुद्देअंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूममधे तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला असतो.काल रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी न्यायालय अधीक्षक कार्यालयाच्या खिडकीचे दोन गज कापून आत प्रवेश केला.नंतर आतील स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून त्यातील कपाटातून मुद्देमालाच्या तीन पेट्या लंपास केल्या.

अंबाजोगाई ( बीड ) : शहरातील जिल्हा व सत्र न्यायलयातील स्ट्राँग रूम चोरट्यांनी काल रात्रीच्या सुमारास फोडली. चोरट्यांनी थेट न्यायालयात चोरी करण्याची हिम्मत केल्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँग रूममधे तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला असतो. काल मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी न्यायालय अधीक्षक कार्यालयाच्या खिडकीचे दोन गज कापून आत प्रवेश केला. नंतर आतील स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून त्यातील कपाटातून मुद्देमालाच्या तीन पेट्या लंपास केल्या. या पेट्यात काही रोख रक्कम आणि ठेवींच्या पावत्या असल्याचे समजते. 

सकाळी अधीक्षक कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी कार्यालय उघडल्यानंतर चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती कळताच अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, पोलीस निरिक्षक सोमनाथ गिते यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. सध्या पंचनामा सुरू असून त्यानंतर नेमका काय आणि किती मुद्देमाल चोरी गेला याची अधिकृत माहिती कळू शकेल.

दरम्यान, मध्यंतरीच्या काळात अंबाजोगाई शहरातील थंडावलेले चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले आहे. यावेळेस चोरट्यांनी थेट न्यायालयाची स्ट्राँगरूम फोडण्याची हिम्मत केल्याने शहरात भितीचे वातावरण आहे. जर न्यायालयच सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न नागरीकांना पडला आहे.

Web Title: Excited! The Strong Room of Ambajogai District Court was thieved by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.