कोळसा पाडणाऱ्या वृद्ध मजुराचा संशयास्पद मृतदेह आढळ्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2022 02:42 PM2022-01-21T14:42:17+5:302022-01-21T14:42:36+5:30
आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथील घटना
कडा ( बीड ) : रायगड जिल्ह्यातून आलेल्या एका मजुराचा संशयास्पद मृतदेह आज सकाळी घुमरी पिंपरी येथे आढळून आला. पांडू चंदर पवार ( ५५, रा.परली. जि. रायगड ) असे मृताचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील घुमरी पिंपरी येथे गेल्या मागील काही महिन्यांपासून रायगड जिल्ह्यातून आलेले कोळसा पाडणारे मजूर वास्तव्यास आहेत. यातील एका कुटुंबातील ५५ वर्षीय वृद्धाचा मृतदेह गावातीलच म्हसोबा मंदिराच्याजवळ संशयास्पद अवस्थेत मृतदेह आज सकाळी आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. माहिती समजातच आष्टी पोलिस गावात दाखल झाले. दरम्यान, वयोवृद्ध कामगाराचा मृत्यू नेमका कशाने झाला, घातपात की नैसर्गिक मृत्यू याचा बारकाईने तपास सुरू आहे.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक सलिम चाऊस, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय देशमुख, पोलिस हवालदार बाबासाहेब राख, बाबासाहेब गर्जे, मंगेश मिसाळ,बंडु दुधाळ,सचिन कोळेकर, दादासाहेब भगत, वाहन चालक प्रताप घोडके आदी कर्मचारी आहेत. तपास सुरु असून लवकरच यातील सत्य समोर येईल, अशी माहिती पोलीस निरीक्षक सलिम चाऊस यांनी दिली.