अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:35 AM2021-05-08T04:35:37+5:302021-05-08T04:35:37+5:30

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मिळलेले आरक्षण रद्द केल्याने, आमदार विनायक मेटे यांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा ...

Expel Ashok Chavan from the cabinet | अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

अशोक चव्हाणांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा

Next

बीड : सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला मिळलेले आरक्षण रद्द केल्याने, आमदार विनायक मेटे यांनी सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. ६ मे रोजी बीड येथे मराठा समाजातील विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेत मोर्चाची घोषणा केली. ७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले. यात निष्क्रिय पद्धतीने मराठा आरक्षण विषय हाताळणारे मंत्री अशोक चव्हाण यांची मंत्रिमंडळातून हाकालपट्टी करण्याची मागणी आ.मेटे यांनी एका निवेदनाद्वारे केली आहे.

मराठा समाजावर आघाडी सरकारने जो अन्याय केला आहे, मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन व संघर्ष करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांच्याकडे बोट दाखवून वेळकाढूपणा करण्याऐवजी, आपण स्वत: राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मराठा समाजाला काय आणि कसा न्याय देणार, आरक्षण कसे देणार आहे. हे अगोदर सांगावे. अशोक चव्हाण यांच्यामुळेच मराठा समाजावर ही वेळ आली आहे. म्हणून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणीही आमदार मेटे यांनी निवेदनद्वारे केली आहे. यावेळी शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक बी.बी. जाधव, ॲड.मंगेश पोकळे, गंगाधर काळकुटे, सुहास पाटील, राजेश भुसारी, डॉ.प्रमोद शिंदे, अनिल घुमरे, संजय पवार, मनोज जाधव, अशोक सुखवसे, विनोद कवडे, शेषेराव तांबे, विजय सुपेकर उपस्थित होते.

===Photopath===

070521\07_2_bed_4_07052021_14.jpg

===Caption===

जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांना निवेदन देताना आ.विनायक मेटे व इतर पदाधिकारी कार्यकर्ते दिसत आहेत. 

Web Title: Expel Ashok Chavan from the cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.