बीडमध्ये जलवाहिनी दुरुस्तीवर वर्षाला ८० लाखांचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:34 AM2021-01-25T04:34:42+5:302021-01-25T04:34:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : शहरवासीयांना सध्या ८ ते १० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड आहे. सुरळीत ...

Expenditure of Rs. 80 lakhs per annum on repair of waterways in Beed | बीडमध्ये जलवाहिनी दुरुस्तीवर वर्षाला ८० लाखांचा खर्च

बीडमध्ये जलवाहिनी दुरुस्तीवर वर्षाला ८० लाखांचा खर्च

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : शहरवासीयांना सध्या ८ ते १० दिवसाला पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांची ओरड आहे. सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने पालिकेबद्दल रोष आहे. वारंवार जलवाहिनी लिकेज आणि खंडित वीज पुरवठ्याचे कारण दिले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. मागील वर्षात जलवाहिनी लिकेजवर पालिका जवळपास ८० लाख रुपयांची उधळपट्टी करीत असल्याचे समोर आले आहे. तसेच वीज बीलही प्रति महिना सरासरी ३५ ते ४० लाख रुपये येत असल्याचे सांगण्यात आले. २०११ च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या २ लाख ३ हजार २४० एवढी आहे. परंंतु त्यांना पाणीपुरवठ्यासाठी केवळ १२५ कर्मचारी आहेत. अपुऱ्या मनुष्यबळावर आणि जलवाहिनी जुनी झाल्याने वारंवार लिकेज होत असल्याने पाणी पुरवठ्यात अडचणी येत आहेत. नवीन पाईपलाईन झाल्यास हा त्रास कमी होईल.

व्हाॅल्व्हमधून पाणी गळती

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवर शहरात ठिकठिकाणी व्हाॅल्व्ह काढलेले आहेत. बार्शी रोडवरून केएसके महाविद्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील व्हाॅल्व्हमधून मागील अनेक वर्षांपासून पाणी गळती होत असल्याचे दिसत आहे.

लिकेजमुळे २० टक्के पाणी वाया

बीड शहराला होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्यापैकी तब्बल २० टक्के पाणी वाया जाते. असे असले तरी एकूण पाणी पुरवठ्याच्या १५ टक्के पाणी वाया जाण्याचे प्रमाण गृहीत धरले जाते. परंतु शहरातील जुन्या जलवाहिनी आणि वारंवार रस्त्यांचे कामे सुरू राहत असल्याने जलवाहिनी लिकेज होत राहते. यामुळे ५ टक्के पाणी जास्त वाया जाते.

शहराला दररोज ३२ एमएलडी पाण्याची गरज असते. माजलगाव धरणातून २० तर बिंदुसरा धरणातून ८ असे २८ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होतो. एकूण पाणीपुरवठ्याच्या १५ टक्के पाणी वाया जाऊ शकते. जलवाहिनी लिकेज होताच दुरुस्ती केली जाते.

- राहुल टाळके, अभियंता पाणीपुरवठा विभाग

Web Title: Expenditure of Rs. 80 lakhs per annum on repair of waterways in Beed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.