टेंडरवर पाण्यासारखा खर्च, माजलगावकरांना मात्र निर्जळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:32 AM2021-03-19T04:32:31+5:302021-03-19T04:32:31+5:30

पुरूषोत्तम करवा माजलगाव : शहरात लवकरात लवकर पाणीपुरवठा व्हावा, यासाठी येथील नगरपालिकेने चार महिन्यांपूर्वी साडेसात लाख रुपये महिन्याने एक ...

Expenditure like water on tender, but dehydrated to Majalgaonkars | टेंडरवर पाण्यासारखा खर्च, माजलगावकरांना मात्र निर्जळी

टेंडरवर पाण्यासारखा खर्च, माजलगावकरांना मात्र निर्जळी

googlenewsNext

पुरूषोत्तम करवा

माजलगाव : शहरात लवकरात लवकर पाणीपुरवठा व्हावा, यासाठी येथील नगरपालिकेने चार महिन्यांपूर्वी साडेसात लाख रुपये महिन्याने एक टेंडर दिले. हे टेंडर दिल्याने नगरपालिकेला वर्षाला ६६ लाख रुपये नुकसान होणार आहे. चार वर्षांपूर्वी येथील नगराध्यक्षपदी सहाल चाऊस विराजमान झाले, तेव्हा दोन महिन्यात केवळ पाच वेळा नागरिकांना पाणी मिळत असे. त्यांनी पदभार घेताच प्रथम त्यांनी पाणीपुरवठयाकडे लक्ष देऊन सहा महिन्याच्या आत पाणी पुरवठा सुरळीत करत ५ ते ६ वेळेला शहरवासियांना पाणी मिळू लागले. त्या काळात सलग दोन वर्षे दुष्काळ असतांना पाण्यासाठी नागरिकांतून थोडीही ओरड नव्हती.

सहा महिन्यांपूर्वी नगरपालिकेचा पदभार उपाध्यक्षांकडे आल्यानंतर पाणीपुरवठ्याचे टेंडर काढले. या टेंडरधारकाला दरमहिन्याला नगरपालिका साडेसात लाख रुपये देणार असल्याचे येथील मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी सांगितले. यात संबंधित टेंडरधारकाने शुध्द फिल्टर केलेले पाणी चार दिवसाला दयावे, असे टेंडरमध्ये नमूद केले आहे.

हे टेंडर देण्यापूर्वी नगरपालिकेला दर महिन्याला पाणीपुरवठ्यासाठी केवळ दोन लाख रुपये खर्च येत होता, असे एका कर्मचाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

दरमहा पाच लाखांचा फटका

नगरपालिकेला सहा महिन्यापूर्वी पाणीपुरवठा कर्मचारी, ब्लीचिंग व तुरटी यावर केवळ दोन लाख रुपये लागत होते.या हिशोबाने वर्षाला केवळ २४ हजार रुपये खर्च नगरपालिकेला होत होता. असे असतांना नगरपालिका टेंडर काढून वर्षाला जवळपास ९० लाख रुपये खर्च करत असतांना पाच दिवसाला मिळणारे पाणी दहा दिवसाला मिळत आहे.

या टेंडरमुळे नगरपालिकेला वर्षाला ६६ लाख रुपयांचा फटका बसणार आहे. हे ६६ लाख रुपये खरोखरच टेंडर चालकाला जाणार की, पदाधिकाऱ्यांच्या घशात जाणार, असा सवाल शहरातील नागरिकांतून उपस्थित केला जात आहे.

नावाला टेंडर एकाच्या नावे तर चालक दुसराच ?

नगरपालिकेला वर्षाला ६६ लाख रुपये पाणीपुरवठयाच्या टेंडरमुळे फटका बसत आहे. हे टेंडर केवळ नावाला दिले आहे. मात्र, याचा चालक नगरपालिकेतीलच पदाधिकारी असल्याची चर्चा नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांसह शहरातील नागरिकांमध्ये होत आहे. विरोधी नगरसेवक व सामाजिक संघटनाही यावर बोलण्यास तयार नाहीत.

टेंडर चालकाने चार- पाच दिवसाला पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. परंतु तो दहा दिवसाला पाणीपुरवठा करत असल्याने त्याचे टेंडर पुढे चालू ठेवायचे किंवा नाही, याबाबत चर्चा सुरू आहे.

- विशाल भोसले, मुख्याधिकारी, न. प. माजलगाव

Web Title: Expenditure like water on tender, but dehydrated to Majalgaonkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.