घरांच्या खिडक्यांमधून केले महागडे मोबाईल लंपास; आरोपी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:00 PM2021-02-06T17:00:59+5:302021-02-06T17:21:08+5:30

मागच्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी घरामधून मोठ्या शिताफीने मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या.

Expensive mobile lamps made from windows; Young arrested | घरांच्या खिडक्यांमधून केले महागडे मोबाईल लंपास; आरोपी अटकेत

घरांच्या खिडक्यांमधून केले महागडे मोबाईल लंपास; आरोपी अटकेत

Next

माजलगाव : घरात रात्रीच्या वेळी कोणी नसल्याचा फायदा घेत घरात घुसून मोबाईल चोरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. तारेख मुसा पठाण असे आरोपीचे नाव आहे. आरोपीकडून विविध कंपन्याचे ६ महागडे मोबाईल हस्तगत करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

माजलगाव शहरात गेल्या अनेक महिन्यापासून मोबाईल चोरीच्या  घटना वाढल्या आहेत. आठवडी बाजार, रहदारीची ठिकाणे येथे होणाऱ्या मोबाईल चोऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरु होते. परंतु, मागच्या पंधरा दिवसांपासून रात्रीच्या वेळी घरामधून मोठ्या शिताफीने मोबाईल चोरी होण्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. पोलिसांनी गुरुवारी ( दि.4 ) तारेख पठाण या संशयितास ताब्यात घेतले. चौकशीत तारेख पठाण याने शहरातील विविध ठिकाणीवरुन तब्बल ७५ हजाराचे ६ मोबाईल लंपास केल्याची कबुली दिली. 

खिडकीतून चोरले मोबाईल 
रात्रीच्या चार्जिंगला लावलेले, खिडकीत ठेवलेले मोबाईल चोरट्याने लंपास केले आहेत. आरोपीला न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास सपोनि अविनाश राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एन. डापकर हे करत आहेत.

Web Title: Expensive mobile lamps made from windows; Young arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.