टीव्हीचा स्फोटामुळे घरातील साहित्य खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 12:12 AM2019-02-04T00:12:28+5:302019-02-04T00:14:13+5:30
विद्युत मीटरमध्ये स्पार्किंग झाल्याने दुरचित्रवाणी संचाचा स्फोट होऊन घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील कºहेवडगाव येथे घडली.
आष्टी : विद्युत मीटरमध्ये स्पार्किंग झाल्याने दुरचित्रवाणी संचाचा स्फोट होऊन घराला आग लागून मोठे नुकसान झाल्याची घटना तालुक्यातील कºहेवडगाव येथे घडली.
२ फेब्रुवारी रोजी कºहेवडगाव येथील पोपट बळीराम गायकवाड यांच्या राहत्या घरी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास विद्युत मीटरमध्ये अचानक स्पार्किंग होऊन ठिणग्या झाल्याने विद्युत मीटरजवळ असलेल्या दुरचित्रवाणी संचाचा मोठा स्फोट झाला. संचाने पेट घेतल्यानंतर संसारोपयोगी वस्तु,कपडे, मिक्सर, फॅन यासह लोखंडी कपाट व त्यामध्ये असलेले रोख १६ हजार रु पये जागीच जळून खाक झाले. स्फोटाचा आवाज ऐकून शेजारी व परिसरातील लोकांनी घटनास्थळी धाव घेत विद्युत पुरवठा खंडीत करु न आग विझलिी. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. या घटनेचा तलाठी शेळके व महावितरणाचे अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. पंचनाम्यात ३० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमुद केले आहे. गायकवाड कुटूंबीयांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी क-हेवडगाव येथील ग्रामस्थांनी केली आहे.