शिवसंपर्क मोहिमेतून सत्तेचा वाटा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:23 AM2021-07-20T04:23:16+5:302021-07-20T04:23:16+5:30

अंबाजोगाई : अडचणी सोडविण्यासाठी गोरगरिबांच्या पाठीशी शिवसेना सदैव खंबीरपणे उभी राहत असते. त्याचप्रमाणे शिवसंपर्क मोहिमेतून गोरगरीब जनतेचे प्रश्न ...

Extend the share of power to the poor through Shiv Sampark campaign | शिवसंपर्क मोहिमेतून सत्तेचा वाटा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवा

शिवसंपर्क मोहिमेतून सत्तेचा वाटा गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचवा

Next

अंबाजोगाई : अडचणी सोडविण्यासाठी गोरगरिबांच्या पाठीशी शिवसेना सदैव खंबीरपणे उभी राहत असते. त्याचप्रमाणे शिवसंपर्क मोहिमेतून गोरगरीब जनतेचे प्रश्न तात्काळ सोडवून सत्तेचा वाटा पोहोचवा, असे प्रतिपादन जिल्हा प्रमुख आप्पासाहेब जाधव यांनी केले.

शिवसंपर्क मोहीम अंतर्गत चनई, मोरेवाडी , सोमनाथ बोरगाव येथे झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हा समन्वयक संजय महाद्वार, उपजिल्हाप्रमुख शिवाजी कुलकर्णी, तालुका प्रमुख अर्जुन वाघमारे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जिल्हा सहसंघटक अशोक गाढवे, चनईचे सरपंच अनिल शिंदे, धावडीचे नेते काशीनाथ घुले, अतुल उगले, दगडवाडीचे सरपंच विजय कुंडगर, दासू पाटील बादाडे, कुरणवाडीचे सरपंच कल्याण मोहिते, दिनेश मोहिते, गणेश कदम, महादेव वैराळे आदींची उपस्थिती होती.

शिवसैनिकांनी ध्येय ठरवून आगामी नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत भगवा फडकवावा, असे आवाहन यावेळी आप्पासाहेब जाधव यांनी केले. यावेळी चनई, मांडवा, दगडवाडी, कुरणवाडी ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. सोमनाथ बोरगाव येथील रस्त्याच्या दुरवस्थेची पाहणी केली.

हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपतालुकाप्रमुख खंडू पालकर, शहर समन्वयक अर्जुन जाधव, उपशहरप्रमुख गणेश जाधव, रत्नेश्वर वाघमारे, विद्यार्थी सेना तालुका प्रमुख अभिमन्यू वैष्णव, हनुमंत हावळे, सर्कल प्रमुख दीपक मुळूक, गणेश देवकते, राम भोसले, बळी तात्या गंगणे, उत्तम कुंडगर, अशोक दळवे, रवी मुडेगावकर, विशाल कुलकर्णी, राजेभाऊ पटाईत, सतीश सोमवंशी, आदींनी परिश्रम घेतले. यावेळी नागरिकांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

Web Title: Extend the share of power to the poor through Shiv Sampark campaign

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.