भरणा करताना जादा आलेले एक लाख रुपये ग्राहकाला केले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:23 AM2021-06-19T04:23:06+5:302021-06-19T04:23:06+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : बँकेत पैसे भरण्यास दिलेल्या रकमेत एक लाख रुपये जास्त असल्याचे महिला रोखपालाच्या निदर्शनास आल्याने ...

The extra Rs | भरणा करताना जादा आलेले एक लाख रुपये ग्राहकाला केले परत

भरणा करताना जादा आलेले एक लाख रुपये ग्राहकाला केले परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : बँकेत पैसे भरण्यास दिलेल्या रकमेत एक लाख रुपये जास्त असल्याचे महिला रोखपालाच्या निदर्शनास आल्याने त्यांनी याची माहिती शाखा व्यवस्थापकांना देत त्यांच्या हस्ते बँकेच्या ग्राहकास एक लाख रुपये परत केले.

केज शहरातील मंगळवार पेठेतील मराठवाडा ग्रामीण बँकेचे ग्राहक कृषी दुकानदार गोविंद गायकवाड यांनी गुरुवारी बँकेत २ लाख ६९ रुपये भरण्यासाठी स्लिप भरून दिली. मात्र, पैसे देताना स्लिपवर लिहिलेल्या रकमेपेक्षा एक लाख रुपये जास्त देण्यात आले. मात्र, पैसे मोजून घेताना रोखपाल रचना भुतांबरे यांना ग्राहकाने स्लिपवर लिहिलेल्या रकमेपेक्षा एक लाख रुपये जास्त दिल्याचे लक्षात आले. त्यांनी ही माहिती बँकेचे शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर यांना दिली. त्यानंतर त्यांनी त्या ग्राहकास जास्त आलेले एक लाख रुपये परत केले. महिला रोखपाल रचना भुतांबरे यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचा बँकेचे ग्राहक गोविंद गायकवाड यांनी सत्कार केला. यावेळी शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर, रोखपाल तेजस्विनी निर्मळ, अधिकारी अक्षय भुतेकर, शाम थोरात आदींची उपस्थिती होती

===Photopath===

180621\img-20210618-wa0024.jpg

===Caption===

महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या रोकपाल रचना भुतांबरे यांचा सत्कार बँकेचे ग्राहक गोविंद गायकवाड यांनी केला यावेळी शाखा व्यवस्थापक प्रवीण सोनवळकर ,रोखपाल तेजस्विनी निर्मळ

Web Title: The extra Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.