जातेगाव, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:23 AM2021-06-29T04:23:01+5:302021-06-29T04:23:01+5:30

बीड : जिल्ह्यात रविवारी रात्री गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली, तर अन्य तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस ...

Extreme rainfall in Jategaon, Sirsadevi, Revaki, Talwada Mandal | जातेगाव, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा मंडळात अतिवृष्टी

जातेगाव, सिरसदेवी, रेवकी, तलवाडा मंडळात अतिवृष्टी

Next

बीड : जिल्ह्यात रविवारी रात्री गेवराई, माजलगाव, परळी तालुक्यांत पावसाने दमदार हजेरी लावली, तर अन्य तालुक्यांत मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पंधरा दिवसांच्या खंडानंतर पावसाच्या आगमनामुळे शेतकरी सुखावला आहे. सोमवारी सकाळपर्यंत मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी २२.७ मिमी पावसाची नोंद झाली. २८ जून रोजी मागील २४ तासांत बीड तालुक्यात १९, पाटोदा ६, आष्टी ११.६, गेवराई ५५.३, माजलगाव ३३.१, अंबाजोगाई ८.१, केज ४.८, परळी २३.१, धारूर १४.१, वडवणी ३०.७, शिरूर कासार तालुक्यात २३.२ मिमी पाऊस झाला. १ ते २८ जूनपर्यंत एकूण सरासरी १८०.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस

मागील २४ तासांत गेवराई तालुक्यातील जातेगाव, सिरसदेवी मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. या मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस नोंदला आहे. जातेगाव मंडळात ८४ मिमी, सिरसदेवी मंडळात ७७.५, रेवकी मंडळात ८३.८, तर तलवाडा मंडळात ७३.३ मिमी पाऊस नोंदला आहे.

-----------

१०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेली मंडळे

बीड तालुक्यात बीड, पाली, म्हाळस जवळा, राजुरी नवगण, पिंपळनेर, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा, नेकनूर, लिंबागणेश मंडळ

पाटोदा तालुक्यातील पाटोदा, दासखेड, थेरला, अंमळनेर मंडळात, तर आष्टी तालुक्यातील आष्टी, टाकळसिंग, दौलावडगाव, पिंपळा गेवराई तालुक्यात गेवराई, मादळमोही, जातगाव, पाचेगाव, धोंडराई, उमापूर, चकलांबा, सिरसदेवी, रेवकी आणि तलवाडा, माजलगाव तालुक्यात माजलगाव, गंगामसला, किट्टीआडगाव, तालखेड, नित्रुड, दिंद्रुड, अंबाजोगाई, पाटोदा(म.), लोखंडी सावरगाव, घाटनांदूर, बर्दापूर, केज तालुक्यात केज, युसूफ वहगाव, हनुमंत पिंपरी, होळ, विडा, बनसारोळा, नांदुरघाट, परळी तालुक्यात परळी, धर्मापुरी, नागापूर, सिरसाळा, पिंपळगाव गाढे, धारूर तालुक्यात धारूर, मोहखेड,तेलगाव, वडवणी तालुक्यात वडवणी, कवडगाव, शिरूर कासार तालुक्यात शिरूर, रायमोहा, तिंतरवणी मंडळ.

--------

चार मंडळांत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस

बीड तालुक्यात नाळवंडी मंडळात अद्यापही पावसाने हात आखडता घेला असून केवळ ८१.२ मिमी पाऊस झाला आहे. आष्टी तालुक्यात कडा, धामरणगाव, धानोरा मंडळात आतापर्यंत १०० मिमीपेक्षा कमी पाऊस झाला आहे.

---------

सर्वांत जास्त पाऊस परळी मंडळात

जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ३५२ मिमी पाऊस परळी मंडळात नोंदला आहे. दिंद्रुड व पाटोदा (म.) मंडळाही ३०० मिमीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.

---------

२८ दिवसांत १४ दिवस कोरडे

शनिवार आणि रविवारी झालेल्या पावसामुळे जमिनीतील ओल खोलवर गेली आहे. वापसा होताच खोळंबलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे, तर काही ठिकाणी पेरण्या सुरू आहेत. १ ते २८ जूनपर्यंत जिल्ह्यात १३ ते १५ दिवस पाऊस झाला आहे.

----------

Web Title: Extreme rainfall in Jategaon, Sirsadevi, Revaki, Talwada Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.