सात तालुक्यातील २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:40 AM2021-09-09T04:40:45+5:302021-09-09T04:40:45+5:30
बीड : जिल्ह्यात सात तालुक्यातील २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ५६ मिमी ...
बीड : जिल्ह्यात सात तालुक्यातील २१ मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली. मागील २४ तासांत जिल्ह्यात एकूण सरासरी ५६ मिमी पाऊस झाला. बीड तालुक्यात ५३ मिमी, पाटोदा ४४, आष्टी २६, गेवराई ५८.२, माजलगाव ९८.३, अंबाजोगाई ६०.१, केज ३८.८, परळी ७०.२, धारूर ७३.३, वडवणी ९८.४, शिरूर कासार तालुक्यात २३.५ मिमी पावसाची नोंद झाली. १ जून ते ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यात एकूण ७५५.४ मिमी पाऊस नोंदला आहे.
अतिवृष्टीचा दणका सुरूच
बुधवारी मागील २४ तासांत सात तालुक्यातील २१ मंडळात अतिवृष्टी झाली. बीड तालुक्यात म्हाळस जवळा मंडळात ७१.५ आणि पिंपळनेर मंडळात ७७.३ मिमी पाऊस नोंदला. तर पाली, नाळंवडी, राजुरी, पेंडगाव, मांजरसुंबा, चौसाळा आणि नेकनूर मंडळातही जाेरदार पाऊस झाला असला तरी ६५ मिमी पेक्षा काही प्रमाणात कमी असल्याचे आकडेवारी सांगते.
गेवराई तालुक्यात जातेगाव ७३.८, धोंडराई ८४.८, सिरसदेवी ७८.८, रेवकी १०९, तलवाडा मंडळत ९८.३ मिमी पाऊस नोंदला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील पाटाेदा म. मंडळात ६६.५ तर घाटनांदूर मंडळात ९०.३ मिमी पाऊस झाला. परळी तालुक्यातील धर्मापुरी मंडळात १००.८, सिरसाळा मंडळात ६७.५ मिमी पाऊस झाला. धारूर तालुक्यातील धारूर मंडळात ७२.५ मिमी, तेलगाव ८७.५ मिमी तर वडवणी तालुक्यातील वडवणी मंडळात ११०.५ व कवडगाव मंडळात ८४.७ मिमी पाऊस नोंदला आहे. माजलगाव तालुक्यातील माजलगाव मंडळात १२०.५ मिमी, गंगामसला १०६.३, किट्टीआडगाव ९३.८, तालखेड ८३.८, नित्रुड ९१, दिंद्रुड मंडळात ९४.३ मिमी पाऊस नोंदला आहे.