तात्याराव लहाने यांच्या उपस्थितीत शिबिरात दोन हजार नागरिकांची नेत्रतपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2021 04:22 AM2021-07-19T04:22:18+5:302021-07-19T04:22:18+5:30
उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य सप्ताहात ...
उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय मंत्री बीड जिल्हा पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य सप्ताहात परळी व परिसरातील नागरिकांनी या नेत्ररोगनिदान शिबिरामध्ये लाभ घेतला. यातील ज्यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया करायची आहे, त्यांची मोफत शस्त्रक्रिया आयोजकांच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी दिली.
या शिबिरास पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने, डॉ. रागिणी पारेख - विभागप्रमुख नेत्ररोग जे. जे. हॉस्पिटल मुंबई, नगराध्यक्षा सरोजनी हालगे, पंचायत समिती सभापती बालाजी मुंडे, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष राजाभाऊ पौळ, बीड जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब देशमुख, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य वैजनाथराव सोळके, एसआर टी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय अंबेजोगाईचे नेत्ररोग विभागप्रमुख डॉ. भास्कर खैरे, उपजिल्हा रुग्णालय, परळीचे वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. दिनेश कुरमे, डॉ. राजाराम मुंडे, डॉ. रांदड, डॉ. घुगे, डॉ. संभाजी मुंडे, डाॅ. अंकिता हंगरगेकर, डाॅ. केतकी स्वामी, डाॅ. पूजा पाटील, डाॅ. नीलम कवडे, डाॅ. कार्तिक नागरगोजे, डॉ. सुवर्णा टिंबे यांच्यासह नगरसेवक व विविध आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.