कारखान्यांनी उसाची रक्कम शेतकऱ्यांना आठवड्यात द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2019 12:39 AM2019-02-03T00:39:06+5:302019-02-03T00:39:39+5:30
साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे.
अंबाजोगाई : साखर कारखान्यांनी शेतक-यांच्या उसाची रक्कम एफआरपी प्रमाणे एका आठवडयात शेतक-यांना द्यावी. असे न झाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे यांनी दिला आहे. या मागणीचे निवेदन त्यांनी उपजिल्हाधिकारी यांना दिले.
अंबाजोगाई तालुक्यातील शेतकºयांचा ऊस अंबाजोगाई सहकारी साखर कारखाना, येडेश्वरी साखर कारखाना, पनगेश्वर साखर कारखाना या कारखान्यांना मोठ्या प्रमाणात जात आहे. शेतक-यांचा ऊस नेऊन महिना दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरी अद्याप शेतकºयांना एफ.आर.पी.प्रमाणे उसाची रक्कम मिळाली नाही. हमीभावापेक्षा कमी दराने शेतकºयांना भाव दिला जात आहे. तरी एफआरपीप्रमाणे ऊसाची रक्कम एक आठवडयाच्या आत शेतकºयांना देण्यात यावी. दुष्काळी स्थितीमुळे पशुधन असलेल्या शेतकºयांना एकरी ५० हजार रुपये नुकसानभरपाई द्यावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकाºयांना देण्यात आले. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महादेव वाघमारे, तालुकाध्यक्ष सतीश मामडगे, अनिल रांजणकर, अशोक गित्ते, विश्वास जाधव यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.