ग्रामीण तरुणात वाढतेय व्यसनाचे फॅड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:36 AM2021-09-18T04:36:35+5:302021-09-18T04:36:35+5:30

--------- कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; धोका वाढला अंबाजोगाई : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ग्रामीण भागात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. ...

The fad of growing addiction among rural youth | ग्रामीण तरुणात वाढतेय व्यसनाचे फॅड

ग्रामीण तरुणात वाढतेय व्यसनाचे फॅड

Next

---------

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन; धोका वाढला

अंबाजोगाई : अनलॉक प्रक्रियेअंतर्गत ग्रामीण भागात आठवडी बाजारांना परवानगी देण्यात आली आहे. ग्रामीण भागात बाजारही आता मोठ्या पद्धतीने भरू लागले आहे. मात्र कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणात होत आहे. सामाजिक अंतर व मास्कचा वापर क्वचितच केला जातो. अद्यापही कोरोना संपलेला नसल्याने नियमांचे असे उल्लंघन राहिल्यास संसर्गाचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

-------

बसस्थानकाबाहेरील विक्रेते संकटात

अंबाजोगाई : कोरोनाच्या प्रभावामुळे अंबाजोगाईत बसस्थानकाबाहेरील विक्रेत्यांवर मोठा परिणाम झाला आहे. बसस्थानकाच्या बाहेर असणारे बूट पॉलिशवाले, छोट्या-मोठ्या वस्तूंची विक्री करणारे विक्रेते. बस थांबल्यानंतर बसमध्ये पाण्याच्या बाटल्या, बिस्कीट पुडे, विविध खाद्यपदार्थ यांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाही पाहिजे तसा रोजगार उपलब्ध झाला नाही. प्रवाशांची संख्या वाढत आहे. मात्र, विक्रेत्यांकडून वस्तू खरेदी करण्यासाठी प्रवासी धजावत नाहीत.

-----------

शाळा अनुदानाच्या ‘त्या’ अटी रद्द करण्याची मागणी

अंबाजोगाई : विना अनुदानित शाळांना अनुदान देण्यात यावे. अनुदानाच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात. विनाअनुदानित शिक्षकांची पिळवणूक थांबवावी. विनाअनुदानित शाळांच्या अनुदानासाठी असणाऱ्या जाचक अटी रद्द करून त्या शाळांना अनुदान देऊन शिक्षकांना न्याय द्यावा, अशी मागणी शिक्षक मैत्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष विजय रापतवार यांनी केली आहे.

------------

जपून पाणी वापरण्याचे पालिकेचे आवाहन

अंबाजोगाई : यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता झाली आहे. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताचा जलसाठाही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परंतु शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात वाढला आहे. नागरिकांनी आपल्या नळाला तोट्या बसवून पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन नगरपरिषदेचे मुख्याधिकारी गणेश सरोदे यांनी केले आहे.

-------

कीटकनाशकाचा सतत वापर धोक्याचा

अंबाजोगाई : पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना शिफारसीप्रमाणेच फवारणी करणे आवश्यक आहे. जर ठरवून दिलेल्या मात्रेपेक्षा जास्त प्रमाणात औषधांचा वापर झाल्यास फुलगळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकच कीटकनाशक सतत वापरणे धोक्याचे आहे. यासाठी कीटकनाशकांची आलटून-पालटून फवारणी करावी, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी केले आहे.

------------

जमिनी खरडल्या, मदतीची प्रतीक्षा

अंबाजोगाई : तालुक्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. मुसळधार झालेल्या पावसामुळे व सतत पडणाऱ्या पावसाने अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी खरडून गेल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या जमिनी आता पूर्ववत करण्यासाठी जेसीबी मशीन, लेव्हलींग मशीन व ट्रॅक्टर या मशिनरीसाठी शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा भुर्दंड मोजावा लागणार आहे. अगोदरच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना हा खर्च परवडणारा नाही. त्यासाठी शासनाने मदत करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.

----------------------------

Web Title: The fad of growing addiction among rural youth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.