माजलगावात सफाई कामगारांचे न.प.समोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2018 12:52 AM2018-10-04T00:52:46+5:302018-10-04T00:54:06+5:30
येथील नगरपालिकेने सफाई कामगारांच्या पगारातून दहा महिन्यांपासून कपात केलेले कर्जाचे हप्ते बँकेत भरावे व तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगाराने न.प.कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : येथील नगरपालिकेने सफाई कामगारांच्या पगारातून दहा महिन्यांपासून कपात केलेले कर्जाचे हप्ते बँकेत भरावे व तीन महिन्यांचे वेतन तात्काळ देण्यात यावे, या मागणीसाठी बुधवारी सफाई कामगाराने न.प.कार्यालयासमोर उपोषण सुरु केले.
माजलगाव न.प.ने सफाई कामगारांचे वेतन अदा करताना बँकेच्या कर्जाचे हप्ते दहा महिन्यांपासून कपात केले होते. परंतु ती रक्कम बँकेत भरली नाही. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांची खाते थकितमध्ये जावून त्यांना बँकेच्या नोटीसा आल्या आहेत व तीन महिन्यांपासून वेतन न झाल्याने हे सफाई कामगार आर्थिक तंगीत सापडले असून, सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याने या सफाई कामगाराने कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे. तात्काळ हप्ते वर्ग करुन तीन महिन्यांचे वेतन देण्याची मागणी केली आहे. उपोषणात अशोक सुतार, अभिमान टाकणखार, राम मिसाळ, रमेश भिसे, चत्रभूज मिसाळ, चतुराबाई खळगे, सीताबाई कांबळे, जपानबाई वाल्मिकी, मधुबाला जावळे आदींसह ५२ कामगार उपोषणास बसले आहेत. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने कर्मचाºयांची पगार व कपात हप्ते व्याजासह तात्काळ भरणा करावेत, अशी मागणी राँका नगरसेवक शेख मंजूर यांनी केली आहे.