बीडमध्ये बनावट दारू कारखान्याचा पर्दाफाश; एक कोटीचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 06:49 PM2021-10-28T18:49:48+5:302021-10-28T18:53:34+5:30
Fake liquor factory exposed in Beed: या कारखान्यात सुमारे २५ लाख किमतीची देशीदारू, स्पिरिट, दारूचे टँक, रिकामे खोके, बाटल्या व इतर यंत्रसामग्री असा सुमारे एक कोटीचा मुद्देमाल आढळून आला.
बीड : येथील नवीन मोंढ्यानजीक बाह्यवळण रस्त्यालगत चोरीछुपे सुरू असलेल्या बनावट दारू कारखान्यावर छापा टाकून एक काेटी रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला (Fake liquor factory exposed in Beed) . राज्य उत्पादन शुल्क व बीड ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता ही कारवाई केली. (Crime in Beed )
नव्या मोंढ्याजवळील एका बंद पडलेल्या पिठाच्या कारखान्यात बनावट देशीदारू बनवून विक्री केली जात असल्याची माहिती मिळाल्यावरून राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले, ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक योगेश उबाळे, उपनिरीक्षक पवनकुमार राजपूत यांनी छापा टाकला.
या कारखान्यात सुमारे २५ लाख किमतीची देशीदारू, स्पिरिट, दारूचे टँक, रिकामे खोके, बाटल्या व इतर यंत्रसामग्री असा सुमारे एक कोटीचा मुद्देमाल आढळून आला. तो जप्त केला आहे. दरम्यान, रोहित राजू चव्हाण (२४, रा. एमआयडीसी, बीड) याच्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कार्यालयात गुन्हा नोंद करण्यात आला. तो फरार आहे. या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे.