तीर्थक्षेत्र पाचांळेश्वर येथील भक्त निवास वापराविना पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:38 AM2021-01-16T04:38:05+5:302021-01-16T04:38:05+5:30
गेवराई : तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या व श्री दत्तात्रय भोजनस्थान असलेल्या पाचांळेश्वर येथे दर अमावस्येला, पोर्णिमेला तसेच दत्त जयंतीला येथे ...
गेवराई : तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या व श्री दत्तात्रय भोजनस्थान असलेल्या पाचांळेश्वर येथे दर अमावस्येला, पोर्णिमेला तसेच दत्त जयंतीला येथे हजारो भाविक भक्त दर्शनाला येतात. मात्र येथे येणाऱ्या भाविक भक्ताना येथे राहण्यासाठी सोय नसल्याने माजी आ.अमरसिंह पंडित यांनी लाखो रूपये खर्च करून दोन मजली भव्य असे भक्त निवास बांधले. मात्र ते चालू न झाल्याने तसेच पडून आहे.
ते चालू करून भाविकांची सोय करावी, अशी मागणी भाविक भक्तातून होत आहे. पाचांळेश्वर येथे दर गुरूवारी तसेच अमावस्येला, पोर्णिमेला येथे महाराष्ट्र, दिल्ली, पंजाब, राजस्थान, कर्नाटकसह विविध राज्यातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. मात्र येथे येणा-या भाविकांना राहण्याची कसलीच सोय नसल्याने भाविकांचे हाल होत होते. हे हाल पाहून माजी आ.अमरसिंह पंडित यांनी त्यांच्या फंडातून गेल्या काही वर्षापुर्वी खास भक्तांच्या मागणीची दखल घेऊन गावात भव्य दोन मजली असे भक्त निवास बांधले. यात सर्व सुविधा देण्यात आल्या. तसेच सर्व बाजुनी संरक्षण भिंत बांधून गेट लावण्यात आले. मात्र ते चालु न झाल्याने ते गेल्या अनेक वर्षांपासून तसेच पडून आहे. हे भक्त निवास भक्तासाठी चालू करावे, अशी मागणी गावातील नागरिक व भक्तामधून होत आहे.