माजी सैनिकासह कुटुंबाचे तिसऱ्या दिवशी उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 05:05 AM2021-02-28T05:05:46+5:302021-02-28T05:05:46+5:30
पाच वर्षांपूर्वी ग्रामसेवक राजकुमार झगडे व उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गटनंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस ...
पाच वर्षांपूर्वी ग्रामसेवक राजकुमार झगडे व उपसरपंच युवराज ठोंबरे व गणपत ठोंबरे यांनी येथील गटनंबर ७१४ मध्ये कुठलाही वारस नसणारा शासकीय प्लॉट विक्री केला. यावेळी बनावट दस्तऐवज तयार करून जागेचा बांधकाम परवाना गणपत ठोंबरे यांच्या नावे असल्याचा देखावा केला.
कालांतराने शासकीय कामासाठी प्लॉटची ओरिजनल कागदपत्रे लागत असल्याने माजी सैनिक सुरेश मुंडे हे पीटीआर काढण्यासाठी ग्रामपंचायतमध्ये गेले असता हा प्लॉट शासकीय असल्याची बाब उघड झाली.
याप्रकरणी माजी सैनिक मुंडे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर एक महिण्यापूर्वी उपोषण केले होते. त्यावेळी एक महिन्यात जागेची मोजणी करून संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे गटविकास अधिकाऱ्यांनी सांगितले होते. परंतु यात कोणावरच काहीच कारवाई करण्यात आली नसल्याने माजी सैनिकाने आपल्या अपंग मुलांसह कुटुंबासोबत पंचायत समिती कार्यालयासमोर गुरुवारपासून उपोषण सुरू केले. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या उपोषणामुळे उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. दबावापोटी पंचायत समितीचा एकही कर्मचारी भेटायला आला नाही तर गटविकास अधिकारी दोन दिवसांपासून भेटायला आले नसल्याचा आरोप उपोषणार्थीने केला.
===Photopath===
270221\purusttam karva_img-20210227-wa0060_14.jpg