कुटुंबाचाच रोजगार ठप्प, मग भाजीपाला विक्री सुरू केली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:32 AM2021-05-01T04:32:51+5:302021-05-01T04:32:51+5:30
२५ वर्षांचा अक्षय भाजीपाला व्यवसाय करून आपले घर सांभाळत आहे. घरी आई, वडील आणि तीन भाऊ असा परिवार ...
२५ वर्षांचा अक्षय भाजीपाला व्यवसाय करून आपले घर सांभाळत आहे. घरी आई, वडील आणि तीन भाऊ असा परिवार आहे. वडील रिक्षा चालवतात. .घरात जेष्ठ असलेला अक्षयचा एक भाऊ रंगकाम करतो तर दुसरा भाऊ मजुरी करतो. तिसरा भाऊ शिक्षण घेत आहे. एक महिना होऊन गेले शहरात लॉकडाऊन आहे. घरातील इतर सदस्यांच्या कामावर परिणाम झाला आणि सर्वांचा रोजगार बुडाला. अक्षय म्हणाला, मी किराणा दुकानात मुनिम होतो. तेथील नोकरी सोडून भाजीपाला व्यवसाय सुरू केला. सर्वांची जबाबदारी लॉकडाऊनमध्ये माझ्यावर पडली कुटुंबाचा गाडा कसा चालवाचा? असा प्रश्न त्याने केला. शहरातील वडारकॉलनी , माणिक नगर, हबीबपुरा येथे जाऊन दररोज सकाळी मी भाजीपाला विकतो, त्यातून दररोज दोनशे रुपये कमाई होते. त्यावरच घरखर्च चालतो. आम्ही घरात सर्वजण काम करून उपजीविका भागवितो. पण सध्या लॉकडाऊनमुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली. उपजीविका कशी करावी असा प्रश्न पडला आहे. शासनाने निश्चितच अशा काळात भरीव मदत करायला हवी, अशी मागणीही अक्षयने केली.
===Photopath===
300421\img20210430063237_14.jpg