कुटुंबास मारहाण करुन दागिने पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:37 AM2021-08-19T04:37:32+5:302021-08-19T04:37:32+5:30

... मजुराचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला बीड: तालुक्यातील समनापूर शिवारातील बिंदुसरा नदीपात्र लगतच्या पत्र्याच्या शेडमधून मजूर समाधान नागरे (रा. ...

The family was beaten and jewelry was stolen | कुटुंबास मारहाण करुन दागिने पळविले

कुटुंबास मारहाण करुन दागिने पळविले

Next

...

मजुराचा मोबाईल चोरट्यांनी लांबविला

बीड: तालुक्यातील समनापूर शिवारातील बिंदुसरा नदीपात्र लगतच्या पत्र्याच्या शेडमधून मजूर समाधान नागरे (रा. कोकमठाण ता.कोपरगाव जि. अहमदनगर) यांचा पाच हजार किमतीचा मोबाईल चोरट्यांनी १७ ऑगस्ट रोजी लंपास केला. उघड्या शेडमध्ये त्यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता. बीड ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

...

केजमध्ये मायलेकीस काठीने मारहाण

केज: मुलांसमवेत घरी जेवण करत असलेल्या महिलेला बाहेर बोलावून शिवीगाळ केली. तिने याबाबत जाब विचारला असता काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. ही घटना शहरातील क्रांतीनगरात १७ ऑगस्ट रोजी घडली. लता बापूराव लोंढे असे महिलेचे नाव आहे. तिची मुलगी भांडण सोडविण्यास आली तेव्हा तिलाही मारहाण केली. गल्लीतील दीपक लांडगे,कृष्णा पौळ,गोलू पौळ,अक्षय चांदणे यांच्यावर केज ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.

...

माळेवाडीतून सौर ऊर्जेचे साहित्य लंपास

बीड : तालुक्यातील माळेवाडी येथे सौर ऊर्जा पंपाची प्लेट व स्टार्टर असे एकूण ८ हजार रुपयांचे साहित्य चोरट्यांनी लांबविले. ही घटना १५ ऑगस्ट रोजी घडली. आप्पाराव भानुदास भरणे (रा. माळेवाडी) यांच्या तक्रारीवरुन नेकनूर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. हवालदार बाबासाहेब डोंगरे तपास करत आहेत.

...

राजेगाव येथून दुचाकी लंपास

माजलगाव: तालुक्यातील राजेगाव येथे सर्व्हे क्र.३३ मध्ये रस्त्यावर उभी केलेली १५ हजार किमतीची दुचाकी (क्र.एमएच ४४ जे -१५१९) चोरट्यांनी १२ ऑगस्ट रोजी लंपास केली. संतोष भाग्यवंत कचरे (रा. राजेगाव) यांच्या तक्रारीवरुन ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

...

Web Title: The family was beaten and jewelry was stolen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.