कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ‘जिवंत माणुसकी’ कोरोनापासून दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:58 AM2021-03-13T04:58:16+5:302021-03-13T04:58:16+5:30

बीड : कोरोनामुळे रक्ताची नातीही दुरावली. एखादी व्यक्ती मयत झाल्यावर तिच्या अंत्यसंस्कारालाही कोण येत नव्हते. अशा परिस्थिती जीव धोक्यात ...

Far from the ‘living humanity’ corona cremating coroners | कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ‘जिवंत माणुसकी’ कोरोनापासून दूर

कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार करणारी ‘जिवंत माणुसकी’ कोरोनापासून दूर

Next

बीड : कोरोनामुळे रक्ताची नातीही दुरावली. एखादी व्यक्ती मयत झाल्यावर तिच्या अंत्यसंस्कारालाही कोण येत नव्हते. अशा परिस्थिती जीव धोक्यात घालून मसनजोगींनी या बाधितांवर अंत्यसंस्कार केले. नियमित काळजी घेतल्याने त्यांच्यापासून कोरोना दूर राहिला. दुर्दैव म्हणजे या मसनजोगींना मागील अडीच वर्षांपासून वेतन मिळले नसल्याने उपासमार सुरू आहे.

शहरात बार्शीरोडवर संत भगवान बाबा प्रतिष्ठानची स्मशानभूमि, मोंढा रोडला अमरधाम, तर अंकुशनगर भागात वैकुंठधाम अशा तीन सार्वजनिक स्मशानभूमी आहेत. या तीनही स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातात. एप्रिल २०२०पासून बीड जिल्ह्यात कोरोनाने पाय पसरायला सुरुवात केले. मे महिन्यात कोरोनाचा पहिला रुग्ण दगावला. त्याच्यावर अंत्यसंस्कार कोठे आणि कसे करायचे? असा प्रश्न प्रशासनासमोर होता. परंतु, नगरपालिका व आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या बाधित रुग्णावर बार्शी रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले. त्यावेळी बोटावर माेजण्याइतकेच लोक उपस्थित होते. रक्ताच्या अथवा इतर नातेवाइकांना कोरोना संसर्गामुळे येण्यास नकार दिला होता. तेव्हापासून ते आजपर्यंत या तीनही स्मशानभूमितील मसनजाेगी जीव धोक्यात घालून कोरोनाबाधितांवर अंत्यसंस्कार करत आहेत. वारंवार त्यांच्या चाचण्या करण्यात आलेल्या आहेत. सुदैवाने अद्याप एकालाही कोरोनाची बाधा झाली नसल्याचे चंदर शेनोरे यांनी सांगितले. आपण नियमित काळजी घेत असल्याचेही ते म्हणाले.

वेतन, घराअभावी हाल

चंदर शेनोरे यांचे कुटुंब बार्शीरोडवरील स्मशानभूमीत वास्तव्यास होते. परंतु कोरोनामुळे तेथून घर हलविले आणि किरायाच्या घरात राहण्यास गेले. अगोदरच अडीच वर्षांपासून वेतन नाही. त्यातही घरभाड्याचा खर्च वाढल्याने या कुटुंबासमोर पेच निर्माण झाला आहे.

हजार रुपये पदरमोड

एका अंत्यसंस्कारासाठी किमान ४ हजार ५०० रुपयांपर्यंत खर्च येतो. परंतु नगरपालिका केवळ साडेतीन हजार रुपये देते. हजार रुपये पदरमोड करावी लागते. अनेकदा नातेवाइकांकडे हात पसरण्याची वेळ येत असल्याचे सांगण्यात आले.

कोट

कोरोनाबाधित रुग्णांवर जीव धोक्यात घालून अंत्यसंस्कार करतोत. यावेळी माझ्यासह कुटुंब उपस्थित असते. आमच्या अनेकदा कोरोना चाचण्या करण्यात आल्या, परंतु आम्ही नियमित काळजी घेत असल्याने अद्याप कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. आमची मागणी एवढीच आहे की मागील अडीच वर्षांपासून थकलेले मानधन देण्यात यावे. खूप उपासमार होत आहे.

चंदर शेनोरे, मसनजाेगी, बीड

===Photopath===

110321\112_bed_11_11032021_14.jpg

===Caption===

बार्शी रोडवरील स्मशानभूमिचे छायाचित्र.

Web Title: Far from the ‘living humanity’ corona cremating coroners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.