केज तालुक्यातील केकाणवाडीत वीज पडून शेतकऱ्यासह गाय दगावली
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 19:51 IST2025-04-03T19:51:02+5:302025-04-03T19:51:43+5:30
वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला

केज तालुक्यातील केकाणवाडीत वीज पडून शेतकऱ्यासह गाय दगावली
मधुकर सिरसट/केज: तालुक्यात गुरुवारी दुपारी पडलेल्या आवकाळी पावसात आडस केकानवाडी या भागात वीज कोसळून एका शेतकऱ्यासह एक गाय जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे.
देवीदास शहाजी केकाण वसय काणवाडी असे वीज कोसळून मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव असून, ते दुपारी आसरडोह रस्त्याकडील नवरुका शिवारात जनावरे चारीत होते. यावेळी अचानक पाऊस आल्याने ते लिंबाच्या झाडाखाली उभे राहिले. यावेळी या झाडावर वीज कोसळून शेतकरी देवीदास केकाण जागीच ठार झाले तर एक गाय ही दगावली आहे.
वेधशाळेने गारपीट व वादळीवाऱ्यासह अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला होता. या अंदाजा प्रमाणे आज दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास केज तालुक्यातील आडस परिसरात सुसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. या घटनेची माहिती तालुका प्रशासन आणि आडस पोलीस चौकीला देण्यात आली आहे.