कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:25 AM2021-06-06T04:25:35+5:302021-06-06T04:25:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क आष्टी : तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध पिऊन आपल्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी :
तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथील एका शेतकऱ्याने बँकेच्या कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी कीटकनाशक औषध पिऊन आपल्या शेतातच आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली.
भास्कर सोनबा बळे (वय ६२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बळे हे कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आले होते. ते कर्जबाजारीपणामुळे संकटात सापडले होते. यामुळे ते तणावाखाली होते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. दरम्यान, शनिवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास बळे हे शेतात गेले होते. यावेळी शेतातच त्यांनी कीटकनाशक पिऊन आपली जीवनयात्रा संपविली. नातेवाईकांनी त्यांना तातडीने आष्टी ग्रामीण रुग्णालयात आणले. परंतु येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. आष्टी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार बन्सी जायभाय हे करीत आहेत. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.