धारूर येथे महराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत शेतकऱ्याने घेतले विष
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 05:44 PM2019-08-07T17:44:49+5:302019-08-07T17:47:32+5:30
धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील शेतकऱ्याने विषप्राशन केले.
धारूर (वार्ताहर) - धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखेत पिक कर्जचे अर्ज स्वीकारत नसाल्याने शाखा व्यवस्थापकांच्या केबीन मध्ये जाहागिरमोहा येथील युवक शेतकरी राजाभाऊ बंकट कांदे (वय 40) वर्ष यांने विष घेतले त्यंची प्रकृती गंभीर आहे.
धारूर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेत जहागीरमोहा येथील शेतकरी राजेभाऊ बंकट कांदे हा पिक कर्जासाठी वारंवार चकरा मारत होते. मात्र बँकेकडून पीककर्जासाठी कागदपत्र घ्यावे, यासाठी सतत मागणी करूनही पिककर्ज दिल्या जात नव्हते. त्यामुळे बुधवारी दुपारी शाखाधिकाऱ्यांच्या केबीनमध्ये या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर असून, धारूर येथे खाजगी रुग्नालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.