महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 12:37 AM2018-12-13T00:37:35+5:302018-12-13T00:38:13+5:30
पीक कर्ज मिळावे यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकºयांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरसाळा : पीक कर्ज मिळावे यासाठी येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकºयांनी बुधवारपासून उपोषण सुरु केले आहे.
पीक कर्जापासून परिसरातील अनेक शेतकरी वंचित राहिले आहेत. यावर्षी अस्मानी व दुष्काळी संकट, शेतात काही पिकले नाही. त्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यात बँक पीक कर्ज देत नाही म्हणून येथील शेतकरी अडचणीत सापडले आहेत. वेळोवेळी मागणी करुन देखील कर्ज मिळत नाही. कर्जासाठी दिलेले प्रस्ताव धूळखात पडले आहेत. त्याकडे कोणी लक्ष देत नाही. अखेर शेतकºयांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतला आहे.
आंदोलनामध्ये शेकडो शेतकरी सहभागी झाले. यावेळी अनेक शेतकºयांनी समस्यांचा पाढा वाचून दाखवला. जोपर्यंत बँकेकडून योग्य कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहील असा इशारा यावेळी हरिभाऊ बडे यांच्यासह इतर शेतकºयांनी दिला.