गोविंदवाडीत शेतकरी -शास्त्रज्ञ संवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:30 AM2021-01-22T04:30:21+5:302021-01-22T04:30:21+5:30
गेवराई : तालुक्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गोविंदवाडी येथे बुधवारी शेतकरी,शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमातून शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. ...
गेवराई : तालुक्यातील खामगाव येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने गोविंदवाडी येथे बुधवारी शेतकरी,शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमातून शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमास सरपंच अच्युत मराठे, तलाठी तपसे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. के. एल जगताप, डाॅ. संजूला भावर, डाॅ. भैयासाहेब गायकवाड, व डाॅ. तुकेश सुरपाम उपस्थित होते. या कार्यक्रमास गावातील प्रगतशिल शेतकरी, पशुपालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सध्याच्या रब्बी हंगामातील पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. पिकातील किड व्यवस्थापनाबद्दल डाॅ. गायकवाड यांनी सविस्तर माहिती दिली. तर या गावाच्या शिवारात फळे व भाजीपाल्याची लागवड मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे या विषयावर डाॅ. संजूला भावर यांनी माहिती दिली. तर डाळींवर प्रक्रिया करून आर्थिक जिवनमान कशा तऱ्हेने उंचावता येईल, याविषयी डाॅ. तुकेश सुरपाम यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रा. के. एल. जगताप यांनी कोणत्याही प्रकारची पिके घेताना अगोदर माती परिक्षण करून घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेती व्यवसायाबरोबर एखाद्या तरी जोडधंद्याची सांगड घालणे गरजेचे आहे तरच आजचा शेतकरी हा या स्पर्धेच्या युगात ठामपणे ऊभा राहू शकेल. या जोडधंद्यामध्ये दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, या सारखे जोडधंदे शेतीला पुरक उद्योग म्हणून निवडणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. या कार्यक्रमासाठी केंद्रामधील सर्व कर्मचारी व गावातील भाऊसाहेब कदम यांनी अथक परिश्रम घेतले.फ