नापिकीमुळे विष प्राशन करून शेतकऱ्याची आत्महत्या; परळी तालुक्यातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 06:53 PM2018-09-29T18:53:31+5:302018-09-29T18:53:46+5:30
तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील शेतकरी पांडुरंग सिद्राम गित्ते यांनी नापिकीला कंटाळून शुक्रवारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
परळी (बीड ) : तालुक्यातील मौजे नंदागौळ येथील शेतकरी पांडुरंग सिद्राम गित्ते यांनी नापिकीला कंटाळून शुक्रवारी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली.
नंदागौळ येथील पांडुरंग सिद्राम गित्ते (६०) यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या शेतात विषारी द्रव्य प्राशन केले. यानंतर त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी रात्री ७ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यान ३ एकर शेत जमीन आहे. सततच्या नापीकीमुळे व कर्जबाजारीपणामुळे गित्ते हे तणावात होते. यातच त्यांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, तीन मुली व दोन मुले आहेत.