देवाला पाणी घालायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:35 AM2021-04-22T04:35:08+5:302021-04-22T04:35:08+5:30

गेवराई : शेतातील पिराला पाणी घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लुखामसला येथे बुधवारी सकाळी ...

A farmer who went to fetch water to God died due to electric shock | देवाला पाणी घालायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

देवाला पाणी घालायला गेलेल्या शेतकऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

Next

गेवराई : शेतातील पिराला पाणी घालण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विजेचा शाॅक लागून मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील लुखामसला येथे बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पांडुरंग विठ्ठल खुपसे (५४), असे विजेचा शाॅक लागून मृत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास पांडुरंग हे आपल्या शेतातील मंदिरातील पिराला पाणी घालण्यासाठी गेले होते. ते देवाला पाणी घालत असताना तुटलेल्या वीज प्रवाहित वायरचा अचानक शाॅक लागून त्यांचा जागीच मृत्यू झला. याप्रकरणी बीट अंमलदार नामदेव फड व पोलिस काॅन्स्टेबल अमोल खटाने यांनी घटनेचा पंचनामा केल्यांतर मृतदेह येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. मृत शेतकऱ्याच्या कुटुंबात पत्नी, दोन मुले व सून, असा परिवार आहे.

===Photopath===

210421\sakharam shinde_img-20210421-wa0010_14.jpg

Web Title: A farmer who went to fetch water to God died due to electric shock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.