शेतात गुरे चारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:17 PM2021-10-10T12:17:59+5:302021-10-10T12:19:07+5:30
कडा- आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी शेतात जनावरे चारत असताना ...
कडा- आष्टी तालुक्यातील पुंडी येथील एका शेतकऱ्याचा विज पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शनिवारी शेतात जनावरे चारत असताना दुपारच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजेचा कडकडाट सुरू असताना विज अंगावर कोसळून शत्रुघ्न लक्ष्मण काकडे (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील पुंडी येथील शेतकरी शत्रुघ्न काकडे हे जनावर घेऊन शेतात चारण्यासाठी शनिवारी गेले होते. दुपारी तीन साडेतीनच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस व विजा कडकडत असताना हीच कडकडत असलेली वीज त्याच्या अंगावर कोसळल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यावर शनिवारी रात्री उशिरा अंत्यविधी करण्यात आला. त्याच्या पश्यात आई, वडिल, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता पुरुष गेल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.