शेतकऱ्यांच्या २४ विद्युत मोटारी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 12:30 AM2019-05-07T00:30:45+5:302019-05-07T00:32:14+5:30

माजलगाव : माजलगाव धरणातील पाणीपातळी पूर्णपणे खालावली असताना पाणी पिण्यासाठी राखीव आहे. धरण क्षेत्रात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घातलेला ...

Farmers 24 electric cars seized | शेतकऱ्यांच्या २४ विद्युत मोटारी जप्त

शेतकऱ्यांच्या २४ विद्युत मोटारी जप्त

Next
ठळक मुद्देतहसीलदारांची माजलगाव धरण क्षेत्रात कारवाई : सादोळ्याच्या लोणी सावंगी बंधा-यात शेकडो मोटारी

माजलगाव : माजलगाव धरणातील पाणीपातळी पूर्णपणे खालावली असताना पाणी पिण्यासाठी राखीव आहे. धरण क्षेत्रात पाणी उपसा करण्यास प्रतिबंध घातलेला असताना अनेकांनी विद्युत मोटारी लावून पाणी उपसा सुरु केला होता. या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर येथील तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांनी कारवाई करत २४ मोटारी जप्त केल्या.
माजलगाव धरण क्षेत्रातील पाणी दुष्काळी परिस्थितीमुळे मृतसाठ्यात गेले आहे. या दुष्काळामध्ये तालुक्यातील पाण्याचा गंभीर होत असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी माजलगाव धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवले आहे. धरण क्षेत्रातील आजूबाजूचे शेतकरी विद्युत मोटारीने पाणी उपसा करत होते. त्यावर प्रशासनाने बंदी आणली असताना या धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा होत असल्याच्या माहितीवरुन येथील तहसीलदार डॉ.प्रतिभा गोरे यांनी ६ मे रोजी आपल्या पथकामार्फत धरण क्षेत्रातील फुलेपिंपळगाव, एकदरा, सावरगाव या भागात कारवाई केली. तेथे सुरू असलेल्या २४ विद्युत मोटारी जप्त करण्यात आल्या. यासह वडवणी तालुका हद्दीतील धरण क्षेत्रात काडीवडगाव, देवगाव, खापरवाठी, लऊळ क्र.२, देवडी, खळवट लिंबगाव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विद्युत मोटारीने पाणी उपसा सुरु असून यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Web Title: Farmers 24 electric cars seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.