शेतकरी संप : बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक घटली

By admin | Published: June 1, 2017 02:15 PM2017-06-01T14:15:35+5:302017-06-01T14:15:35+5:30

राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाला आहे. कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. आपल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात यासाठी शेतक-यांनी संपाचे हत्यार उपसलं आहे.

Farmer's Contact: Vegetable arrivals in market places decreased | शेतकरी संप : बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक घटली

शेतकरी संप : बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक घटली

Next

ऑनलाइन लोकमक

पुणे, दि. 1 - राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाला आहे. कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. आपल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात यासाठी शेतक-यांनी संपाचे हत्यार उपसलं आहे. 
 
कर्जमाफी मिळत नसल्यानं शेतक-यांनी शेतीमाल रस्त्यांवर ओतून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. 
 
पश्चिम महाराष्ट्रतील महत्त्वाची बाजार पेठ असलेल्या पुण्यातील मार्केटयार्डमध्ये आज 40 टक्के आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्रास सहन करावा लागणार आहे.  
 
पुण्यातील मार्केटयार्डात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक होते. काल बाजारात 1022 गाड्या आवक झाली होती. आज केवळ 750 गाड्या आल्या. हा माल पुणे शहरासह सर्वत्र जातो. आज त्याचा फारसा परिणाम दिसला नसला, तरी शेतक-यांनी बेमुदत आंदोलन केल्यास याचा परिणाम नक्की जाणवेल.  
 
बीडमध्ये आठवडी बाजार भरला नाही
बीड जिल्ह्यात अनेक गावांमध्ये शेतकरी संपाचे परिणाम दिसून येत आहे. शेतकरी संपाला पाठिंबा देण्यासाठी  गेवराई तालुक्यातील पाचेगाव येथील आठवडी बाजार भरला नाही. दरम्यान, येथेही शेतीमालाची आवक घटक आहे. 
(VIDEO : शेतक-यांच्या संपाला हिंसक वळण, वाहनांची तोडफोड)
 
 
दरम्यान शेतक-यांच्या संपाला काही ठिकाणी हिंसक वळण प्राप्त झालं आहे. 
 
नाशिक :
 
निफाड तालुक्यातील नैताळे येथे शेतक-यांनी वाहनांच्या काचा फोडल्या. यामुळे पोलिसांना आंदोलक शेतक-यांवर सौम्य लाठीमार करावा लागला. 
 
शेतकरी संपाला सुरुवात होताच बुधवारी रात्रीपासूनच शेतकऱ्यांनी नाशिक-सापुतारा, पिंपळगाव-सापुतारा, नाशिक-बलसाड या गुजरातला जोडणाऱ्या मार्गांवरुन होणारी भाजीपाला दूधफळे यांची वाहतूक अडवली.  त्यानंतर आज सकाळपासून सुरू असलेली वाहतूक पूर्णतः बंद करण्यात आली असून ठिकठिकाणी भाजीपाला व दुधाचे ट्रक अडकून पडले आहेत.
 
दिंडोरी येथे नाशिक-सापुतारा रस्त्यावरील पालखेड चौफुलीवर शेकडो शेतकरी जमा होत त्यांनी येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली. यात दोन दुधाचे टँकर तर  सात आठ आंब्याचे ट्रक अडवून ते बाजूला लावण्यास सांगितले.  तर आंबे,चिक्कू, नारळ आदी विविध फळे विक्रीस जाणारे जप्त करत ते रस्त्यावर फेकण्यात आले.
 
रासेगाव, पांडणे, वणी,खेडगाव, पिंप्री अचला आदी ठिकाणी भाजीपाला,फळे , दुधाची वाहने रोखण्यात आली आहेत. लासलगाव येथे दूध टँकर थांबवणा-या 8 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
सांगली :
 
मिरज-पंढरपूर रस्त्यावर कवठेमहांकाळजवळच्या अथर्व ढाब्याशेजारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शेळ्या-मेंढ्यांची वाहतूक करणाऱ्या तीन टेम्पोचे टायर फोडले.
 

Web Title: Farmer's Contact: Vegetable arrivals in market places decreased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.