कर्जमुक्ती योजनेपासून शेतकरी वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:37 AM2021-01-16T04:37:52+5:302021-01-16T04:37:52+5:30
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगारनिर्मिती उपलब्ध होणार नाही. ...
रोहयोची कामे ठप्प; काम देण्याची मागणी
अंबाजोगाई : तालुक्यात शेतीचा हंगाम संपत आला आहे. आता रोजगारनिर्मिती उपलब्ध होणार नाही. शेतीतील कामेही संपुष्टात आल्याने शेतमजूर कामाच्या शोधात आहेत. अशा स्थितीत शासनाने रोजगार हमीच्या माध्यमातून गाव रस्ते, शिवरस्ते यांची कामे सुरू केली, तर शेतमजुरांना गावातच काम उपलब्ध होईल. रोजगाराची उपलब्धी होईल. यासाठी रोजगार हमी योजनेची कामे सुरू करावीत, अशी मागणी मजुरांतून होत आहे.
मास्क वापरण्याकडे नागरिकांचे दुर्लक्ष
अंबाजोगाई : शहर व परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मास्कच्या वापराकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष केले जात आहे. अजूनही कोरोनासदृश स्थिती असतानाही नागरिक विनामास्क बिनधास्त वागत आहेत. नागरिकांनी सक्तीने मास्कचा वापर करावा व दक्षता बाळगावी, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.राहुल धाकडे यांनी केले आहे. मास्क हीच खरी कोरोनावरील लस आहे, असेही ते म्हणाले.