पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:39 AM2019-07-28T00:39:39+5:302019-07-28T00:40:30+5:30
जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. जास्त क्षेत्र आणि जास्त पीक पेरा दाखविल्याचा कारण काढत तब्बल २५ हजार शेतक-यांचा विमा ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली थांबविला आहे.
बीड : जिल्ह्यातील शेतक-यांची विमा कंपनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर आले आहे. जास्त क्षेत्र आणि जास्त पीक पेरा दाखविल्याचा कारण काढत तब्बल २५ हजार शेतक-यांचा विमा ‘ओव्हर इन्शुरन्स’च्या नावाखाली थांबविला आहे. याबाबत बीडच्य शाखाधिका-यांनी आता विमा मिळणार नाही, असे सांगितल्याने सर्वत्र संतापाची लाट पसरली आहे. शेतकरी आता आंदोलनाच्या पावित्र्यात असल्याचे दिसून येत आहेत.
गतवर्षीच्या खरीप हंगामाता सोयाबीन या पीकाचा विमा शेतक-यांनी उतरविला. मागील महिनभरापासून शेतकºयांना विम्याची प्रतीक्षा होती. दोन दिवसांपूर्वी काही शेतकºयांना विमा मिळाला. मात्र, जिल्ह्यातील जवळपास २५ हजार शेतकºयांना सोयाबीन विम्यापासून दुर ठेवले आहे. विशेष म्हणजे विमा कंपनीने या शेतकºयांना का दुर ठेवले, याचे उत्तरही संबंधित शाखाधिकाºयांना देता येत नाही. ‘ओव्हर इन्शुरन्स’ साठी काय निकष लावले, याचेही उत्तर कंपनीकडे नसल्याने काही तरी कारण सांगून शेतक-यांचा विमा थांबवून कपंनीकडून फसवणूक केली जात असल्याचे समोर येत आहे.
किसानसभा करणार आंदोलन
शेतकºयांना पीकविम्यापासून वंचित ठेवले आहे. तसेच विमा कंपनीकडून शेतक-यांची लूट थांबवावी, त्यांची चौकशी करावी या मागणीसाठी बीड जिल्हा किसान सभेच्या वतीने ३ आॅगस्टपासून पुण्यात कृषी आयुक्त कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार असल्याचे भाकपचे कॉ. नामदेव चव्हाण यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.
सरसकट दोषी ठरविणे चूक
काही शेतकºयांनी खोटी माहिती भरली असेल किंवा जास्त क्षेत्र दाखविलेही असेल. मात्र, याचा अर्थ सर्वच शेतक-यांनी अशी खोटी माहिती भरली असे होत नाही. विमा कंपनीने एक दोन शेतकºयांचे उदाहरणे डोळ्यासमोर ठेवून तब्बल २५ हजार शेतक-यांना सोयाबीन विम्यापासून वंचित ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे.
कृषी विभागाने झटकले हात
शेतक-यांचा सोयाबीन विमा का नाकारला? याबाबत कृषी विभागाला विचारणा केली.
मात्र, याबाबत आपल्याला काही माहिती नाही. विमा कंपनीने काय निकष लावले, त्यांनी का नाकारला हे कंपनीलाच विचारा, असे सांगून त्यांनी हात झटकले.