शेतकऱ्यांच्या प्रश्नावर एसबीआयसमोर उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:35 AM2021-02-20T05:35:26+5:302021-02-20T05:35:26+5:30
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरणे आठ दिवसांत तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार भीमराव ...
आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांचे पीककर्ज प्रकरणे आठ दिवसांत तात्काळ मार्गी लावा अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा माजी आमदार भीमराव धोंडे यांनी बँक व्यवस्थापकांना १२ रोजी निवेदनाद्वारे दिला होता. शेतकऱ्यांनी पीककर्जासाठी एसबीआय शाखेत एक वर्षापासून अर्ज सादर केले असून, अद्यापपर्यंत कर्ज मंजूर झालेले नाही. याबाबत शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. त्यामुळे लाक्षणिक उपोषण करण्यात आले. यावेळी शाखाधिकाऱ्यांनी आठ दिवसांत नियमानुसार कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले. सरपंच सावता ससाणे, एन. टी. गर्जे, शंकर देशमुख, केशव गर्जे, संदीप नागरगोजे, बाबासाहेब गर्जे, तात्यासाहेब कदम, जाहीर कुरेशी, हजर नालकोल, रघुनाथ शिंदे, बाबू कदम, इम्रान खान, पांडुरंग गावडे, विष्णू गर्जे, संजय दहिफळे, बाळासाहेब शिंदे यासह आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकट
आष्टी तालुक्यातील एसबीआय शाखेच्या अंतर्गत ज्या गावातील शेतकऱ्यांची कर्ज प्रकरणे नियमाने मंजूर करण्यात येतील, ज्या शेतकऱ्यांची अडचण असेल त्यांनी सर्व कागदपत्रे घेऊन बँकेत संपर्क करावा, कोणीही कर्जापासून वंचित राहणार नाही.
- अमितकुमार, शाखाधिकारी, एसबीआय