महागाईचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:34 AM2021-04-24T04:34:03+5:302021-04-24T04:34:03+5:30
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्यप्राणी रानडुक्कर, हरिण यांची संख्या मोठ्या प्रमाणात ...
वन्य प्राण्यांचा उपद्रव वाढला
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात वन्यप्राणी रानडुक्कर, हरिण यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. हे प्राणी सध्या परिसरात उभ्या असणाऱ्या ज्वारी व उसाची मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. हरणाची मोठे कळप या भागात मोठ्या प्रमाणात निर्माण झाले आहेत. त्यांचा पिकांवर सुरू असलेला मुक्तसंचार धोकादायक ठरू लागला आहे. या वन्य प्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष अच्युतराव गंगणे यांनी केली आहे.
शहर बससेवा सुरू करावी
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहराची व्याप्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यशवंतराव चव्हाण चौक ते भगवानबाबा चौक असा मोठा पल्ला शहरवासीयांना पार करावा लागतो. भगवानबाबा चौक ते यशवंतराव चव्हाण चौक या भागात स्वा. रा. ती. रुग्णालयामार्फत शहर वाहतूक बससेवा सुरू झाल्यास शहरवासीयांची मोठी सोय होणार आहे. पूर्वी सुरू झालेली ही सेवा बंद झाली आहे. ती पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र काळे यांनी केली आहे.
वृक्षतोडीकडे दुर्लक्ष
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहर परिसरात वनविभागाची मोठी झाडी आहे. या परिसरात गेल्या अनेक दिवसापासून वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू आहे. सरपणासाठी लोक झाडांचे फांद्या तोडून आणत आहेत. याकडे स्थानिक प्रशासन व वनविभागाचे दुर्लक्ष होऊ लागले आहे.
उन्हाची तीव्रता वाढली
अंबाजोगाई : तालुक्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढतच चालला आहे. परिणामी दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येत आहेत. सकाळी १० वाजल्यापासून उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. सायंकाळपर्यंत उन्हाची तीव्रता कायम राहत आहे. कोरोना राेखण्यासाठी लॉकडाऊन असले तरी शीतपेय, फळांची खरेदी लोक सवलतीच्या वेळेत करत आहेत.