नाफेडच्या खरेदीकडे शेतकऱ्यांची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 11:42 PM2020-01-18T23:42:29+5:302020-01-18T23:43:42+5:30
नाफेडच्या वतीने शासनाच्या हमीदराने सुरु केलेल्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. खुल्या बाजारातील सोयाबीन, उडीद आणि मुगाचे दर हे हमीपेक्षा जास्त असल्याने यंदा खरेदी केंद्रांवर परिपूर्ण नोंदणी होऊ शकली नाही,
अनिल भंडारी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : नाफेडच्या वतीने शासनाच्या हमीदराने सुरु केलेल्या खरेदीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरविली आहे. खुल्या बाजारातील सोयाबीन, उडीद आणि मुगाचे दर हे हमीपेक्षा जास्त असल्याने यंदा खरेदी केंद्रांवर परिपूर्ण नोंदणी होऊ शकली नाही, परिणामी खरेदी निरंक राहिली. दरम्यान तूर खरेदीसाठी नोंदणी सुरु झाली आहे.
आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत नाफेडच्या वतीने खरीप हंगामातील सोयाबीन, उडीद आणि मुगाच्या खरेदीसाठी जिल्ह्यात ९ केंद्रांवर नोंदणी सुरु केली होती. दोन महिन्यांच्या कालावधीत नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाला. केवळ ६७ शेतकºयांनी नोंदणी केली होती. यात ५६ शेतकºयांकडे मूग होता. तसेच नोंदणीसाठी मुदतवाढही देण्यात आली होती, मात्र नंतरच्या कालावधीत खुल्या बाजारातील दर चढे राहिले. परिणामी नाफेडच्या केंद्रांवर खरेदी झाली नाही. आता १ जानेवारीपासून खरीप हंगामातील तूर खरेदीसाठी मार्केटिंग फेडरेशनने सबएजंट संस्थांकडे शेतकºयांची नोंदणी सुरु केली आहे.
बीड जिल्ह्यात ९ सबएजंट संस्थांमध्ये तूर नोंदणी सुरु झाली आहे. १४ फे्रबुवारीपर्यंत शेतकºयांना त्यांच्याकडील तूर विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे. आतापर्यंत २०० शेतकºयांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले.
अतिवृष्टी, जाचक अटींचे कारण
च्मागील वर्षी मृग नक्षत्रामध्ये पावसाने ओढ दिल्याने मुगाचा पेराही घटला होता. तर आॅक्टोबर- नोव्हेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. हाती लागलेले पीक नियमात बसणारे नव्हते.
च्यातच नाफेडच्या वतीने खरेदीसाठी जाहीर केलेले हमीदर खुल्या बाजारातील दरापेक्षा कमी राहिल्याने तसेच नाफेडच्या जाचक अटींमुळे आणि वेळेवर मोबदला मिळण्यास होणाºया विलंबाचा अनुभव लक्षात घेत शेतकºयांनी नोंदणी करण्याचे टाळले.