बीड जिल्ह्यात तहसील कार्यालयांमध्ये शेतकऱ्यांची आर्थिक लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:37 AM2018-07-20T00:37:15+5:302018-07-20T00:37:40+5:30
शेतक-यांना पीककर्ज तसेच इतर कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. पीककर्जाची शेवटची तारीख जवळ येत असताना शेतकºयांची फेरफार नक्कल मिळवण्यासा जिल्ह्यातील तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. याचाच फायदा घेत कार्यालयातील अभिलेख कक्षातील कर्मचारी शेतकºयांची आर्थिक लूट करीत आहेत.
बीड : शेतक-यांना पीककर्ज तसेच इतर कामांसाठी फेरफार नक्कल गरजेची असते. पीककर्जाची शेवटची तारीख जवळ येत असताना शेतकºयांची फेरफार नक्कल मिळवण्यासा जिल्ह्यातील तहसील कार्यालयात गर्दी वाढली आहे. याचाच फायदा घेत कार्यालयातील अभिलेख कक्षातील कर्मचारी शेतकºयांची आर्थिक लूट करीत आहेत.
जिल्ह्यातील शेतकºयांना बँकांमध्ये पीककर्ज घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांच्या अटी व शर्ती आहेत. यामध्ये फेरफार नक्कल ही महत्त्वाची असते. कर्ज घेण्यासाठी इच्छूक असणाºया शेतकºयांना फेरफार नक्कल काढण्यासाठी तहसील कार्यालयातील अभिलेख कक्षात अर्ज करावा लागतो. त्यानंतर ठराविक दिवसांनी त्यांना ती नक्कल दिली जाते.
यासाठी १० ते १५ रुपये घेणे अपेक्षित असताना या कक्षातील कर्मचारी मात्र शेतकºयांची अडवणूक करुन १०० ते ५०० रुपयापर्यंत पैसे घेत आहेत.
पैसे कशाच्या आधारावर घेतले जातात तसेच घेतलेल्या पैशाची पावती का दिली जात नाही असे प्रश्न विचारणाºया शेतकºयांची नक्कल कर्मचारी देत नाहीत. अनेक दिवस उलटूनही नकलेसाठी अडवणूक केली जाते. याप्रकरणी अनेक शेतकºयांनी वरिष्ठांकडे तक्रारी देखील केल्या आहेत. मात्र, वरिष्ठांचे देखील याकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. जिल्ह्यातील सर्वच तहसील कार्यालयात असे गैरप्रकार होत असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.
वडवणी तहसीलदारांचे दुर्लक्ष; जिल्हाधिका-यांना निवेदन
वडवणी तहसील कार्यालयात प्रत्येक नकलेस १०० रुपयांप्रमाणे पैसे घेतले जातात. तलाठ्यांकडे फेरफार नक्कल मिळत नसल्यामुळे तहसील कार्यालयातून ती काढावी लागते. जुन्या कागदपत्रांची झेरॉक्स काढून ही नक्कल दिली जाते. पीककर्जाच्या काळात रोज २०० ते ३०० शेतकरी नक्कल काढतात. १०० रुपयांप्रमाणे रोज ३० हजार रुपये जमा होत असून, याप्रकरणी तहसीलदारांकडे शिवाजी अंकुश यादव यांनी तक्रार केली आहे. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही तहसीलदारांनी केलेली नाही. त्यामुळे सर्व संबंधित अधिकाºयांच्या संगनमताने शेतकºयांची लूट केली जात आहे का ? असा प्रश्न यादव यांनी निवेदनात विचारला आहे.
वरिष्ठांचे दुर्लक्ष
सर्वच तहसील कार्यालयात हा गैरप्रकार होत असल्यामुळे काही सुजाण शेतकºयांनी पेशकार, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्याकडे तक्रार देखील केली. मात्र, याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचे नागरिकांनी सांगितले. त्यामुळे या गैरप्रकाराला त्यांचा पाठिंबा आहे काय ? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला.