‘शेतकऱ्यांनो, कृपा करून आत्महत्या करू नका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:35 AM2021-08-22T04:35:50+5:302021-08-22T04:35:50+5:30
धारूर : शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. कोणत्याही शेतकऱ्याने कृपा करून आत्महत्या करू नये. प्रत्येक समस्येला उत्तर ...
धारूर : शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या ही चिंताजनक बाब आहे. कोणत्याही शेतकऱ्याने कृपा करून आत्महत्या करू नये. प्रत्येक समस्येला उत्तर असते, त्या समस्येला खंबीरपणे तोंड द्यावे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आ.प्रकाश सोळंके यांनी दिली. धारुर तालुक्यातील आत्महत्याग्रस्त ८ शेतकऱ्यांच्या कुटुंबांना शासनाच्या वतीने मदतीच्या धनादेशाचे वितरण येथील तहसील कार्यालयामध्ये करण्यात आले. याप्रसंगी आ.सोळंके बोलत होते. याप्रसंगी तहसीलदार वंदना शेडोळकर, वरिष्ठ लिपिक प्रकाश गोपड, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस ओबीसी सेल प्रा.ईश्वर मुंडे, पंचायत समिती सभापती हनुमंत नागरगोजे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल जगताप, युवक शहराध्यक्ष नितीन शिनगारे, युवक तालुकाध्यक्ष सटवा अंडील, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बालासाहेब मायकर आदी उपस्थित होते.