शेतकऱ्यांची मक्याला पसंती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 04:26 AM2020-12-25T04:26:52+5:302020-12-25T04:26:52+5:30
भाजीपाला स्वस्त झाल्याने दिलासा अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात आठवडाभरापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे ...
भाजीपाला स्वस्त झाल्याने दिलासा
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात आठवडाभरापासून भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे भाजीपल्याचे दर कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. कोथिंबीर,मेथी, शेपू, पालकाची जुडी स्वस्त झाल्याने भाजीपाला खरेदीकडे गृहिणींचा कल वाढला आहे.
पासधारक नसल्याने आगाराला फटका
अंबाजोगाई : अंबाजोगाई येथील एस. टी. आगारातून दर महिन्याला पासेस घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, गेल्या सहा महिन्यांपासून बस बंद आहे. आता बस सुरू झाल्या तर महाविद्यालये व शाळा अद्यापही व्यवस्थित सुरू न झाल्याने महिन्याच्या पासधारकांची संख्या अजूनही घटलेली आहे. जोपर्यंत शाळा-महाविद्यालये व्यवस्थित सुरू होणार नाहीत. तोपर्यंत पासधारकांचा तोटा महामंडळाला सहन करावा लागत असल्याने अंबाजोगाई आगारालाही याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.
बेवारस कुत्र्यांमुळे नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात मोकाट कुत्र्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. प्रामुख्याने शहरातील जुन्या गावात हे प्रस्थ मोठ्या प्रमाणात वाढले आहे. प्रत्येक रस्त्यावर कुत्रे पहावयास मिळतात. मोकाट कुत्रे वाहनांसह पायी जाणाऱ्या व्यक्तींवर धावून जात असल्याने नागरिकांत धास्ती निर्माण झाली आहे. पहाटे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमध्येही यामुळे भीती निर्माण झाली आहे. अनेकजण मोकाट कुत्र्यांच्या धास्तीनेच सकाळी फिरायला जाणे टाळतात. या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासियांमधून होत आहे.