बियाणांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2021 04:33 AM2021-05-10T04:33:53+5:302021-05-10T04:33:53+5:30

अंबाजोगाई : महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ...

Farmers should apply for seeds | बियाणांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

बियाणांसाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

Next

अंबाजोगाई :

महाडीबीटी पोर्टलवर ‘शेतकरी योजना’ या सदराखाली शेतकऱ्यांच्या सोयीकरिता सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याच्या दृष्टीने अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित केलेली आहे. यात बियाणे या घटकाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या सुविधांतर्गत लाभार्थ्यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान या योजनेतील सोयाबीन, भात, तूर, मूग, उडीद, मका, बाजरी इ. अनुदानावर बियाणे उपलब्ध होणार आहेत. १५ मे २०२१ पर्यंत शेतकऱ्यांनी अर्ज करणे बंधनकारक आहे. महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावरील शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी स्वतःच्या मोबाइल, संगणक, लॅपटॉप, टॅबलेट, सामुदायिक सेवा केंद्र, ग्रामपंचायतीतील संग्राम केंद्राच्या माध्यमातून संकेतस्थळावर जाऊन अर्ज करू शकतील. वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आधार क्रमांक सदर संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा लागेल. ज्या वापरकर्त्याकडे आधार क्रमांक नसेल, त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्राकडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. सदर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टलमध्ये नमूद करून त्यांना योजनेसाठी अर्ज करता येईल, अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टलमध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागेल. त्याशिवाय, त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येणार नाही. सदर कामासाठी आपण आपल्या जवळच्या सामूहिक सेवा केंद्राची मदत घेऊ शकता. यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण आल्यास ई-मेलवर किंवा कृषी कार्यालय संबंधित कृषी सहायक कृषीमित्र यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी एस.डी. शिनगारे व अंबाजोगाईचे तालुका कृषी अधिकारी आर.डी. बर्वे यांनी केली आहे.

Web Title: Farmers should apply for seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.