शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:41 AM2021-09-09T04:41:25+5:302021-09-09T04:41:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बीड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप व रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे पंचनामे करुन शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेच्यावतीने जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्याकडे ८ सप्टेंबर रोजी करण्यात आली.
पिके जोमात असताना पावसाने महिनाभर उसंत घेतली. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली होती, शिवाय उत्पादन क्षमतेवर परिणाम झाला होता. आता अतिवृष्टीमुळे माेठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकऱ्यांना झळ सोसावी लागणार आहे. दरम्यान, काही ठिकाणी पडझड झाली तर कुठे पशुधन वाहून गेले. पूरग्रस्त भागातील नुकसान कदापि भरुन न निघणारे आहे. यासंदर्भात पंचनामे करुन तातडीने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी शिवसेना किसान सेनेचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी जिल्हा समन्वयक बप्पासाहेब घुगे, उपजिल्हाप्रमुख गणेश वरेकर, युवा सेना जिल्हाप्रमुख सागर बहिर आदी उपस्थित होते.
080921\08bed_18_08092021_14.jpg
जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन किसान सेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांनी कैफियत मांडली