शेतकऱ्यांनी स्वतःच करावी पीक पाहणी, नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2021 04:28 AM2021-01-15T04:28:01+5:302021-01-15T04:28:01+5:30

अंभोरा : भविष्यातील शेतीसंदर्भात योजनांचा फायदा घेण्यासाठी स्वतःच स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून, स्वतःच स्वत:च्या ...

Farmers should do their own crop inspection and registration | शेतकऱ्यांनी स्वतःच करावी पीक पाहणी, नोंदणी

शेतकऱ्यांनी स्वतःच करावी पीक पाहणी, नोंदणी

googlenewsNext

अंभोरा : भविष्यातील शेतीसंदर्भात योजनांचा फायदा घेण्यासाठी स्वतःच स्वतःच्या मोबाईलवरून ई-पीक पाहणी ॲप डाऊनलोड करून, स्वतःच स्वत:च्या खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांतील पिकांची नोंदणी करणे (पीक पेरा) काळाची गरज आहे. यामुळे पीकविमा योजना, सुलभ कृषी पीक कर्ज पुरवठा, नैसर्गिक आपत्तीत जलद व अचूक मदत मिळणे, शेतीमालाची आधारभूत दराने शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करण्यासाठी सोयीचे होणार असून, सर्व शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन लोणी सय्यदमीर सज्जाचे तलाठी गजेंद्र राठोड यांनी केले.

आष्टी तालुक्यातील साकत येथे भैरवनाथ मंदिरासमोर आयोजित पीक पाहणी प्रशिक्षणात राठोड यांनी ग्रामस्थांना आवाहन केले. महाराष्ट्र शासन व टाटा ट्रस्टच्या सौजन्याने शेतातील उभ्या पिकांची नोंदणी करण्यासाठी अँड्रॉइड मोबाईलमध्ये ई-पीक पाहणी हे ॲप गूगल प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करून घ्यावे. वर्षातील दोन्ही हंगामांतील खरीप, रब्बी हंगामांतील पिकाची नोंद, शेतकऱ्यांनी सातबारा उताऱ्यावर पीक पेराची नोंद कराव्यात. यापुढे पीक नोंदी लावण्यासाठी तलाठ्याकडे हेलपाटे मारावे लागणार नाहीत. शासनाच्या योजनांचा लाभ घेता येईल, पीक नोंदी सातबारा उताऱ्यावर नसली तर भविष्यात शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार नाही असे राठोड म्हणाले. कृषिसेवक चौधरी, साकतचे सरपंच ज्ञानदेव सासवडे, ग्रामपंचायत सदस्या हौसाबाई शिंदे, संतोष गुंड, राजू भोगाडे व ग्रामस्थ सागर भोगाडे, दीपक शिंदे, विठ्ठल वाघ, बापू शिंदे सर, दादासाहेब शिंदे, बाळासाहेब भोगडे, संजय अरुणे, महादेव भोगडे, प्रदीप गुंड, हिरामण अरुणे, चंद्रकांत गुंड, बाबासाहेब शिंदे, रघुनाथ भोगडे, उत्तम शिंदे, बाळासाहेब थोरात, बाबासाहेब थोरात, आदी असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सरपंच ज्ञानदेव सासवडे यांनी केले. बापू शिंदे यांनी आभार मानले.

Web Title: Farmers should do their own crop inspection and registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.