पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी दुष्काळाचा धैर्याने सामना करावा : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 03:40 PM2019-05-13T15:40:24+5:302019-05-13T15:41:48+5:30

यावर्षीचा दुष्काळ १९७२ पेक्षा भयंकर 

Farmers should face drought courageously to save pets : Sharad Pawar | पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी दुष्काळाचा धैर्याने सामना करावा : शरद पवार

पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी दुष्काळाचा धैर्याने सामना करावा : शरद पवार

googlenewsNext

बीड : - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या बीड जिल्ह्यातील दुष्काळी दौर्‍याला आज सकाळी आष्टी तालुक्यातील खडकत येथून सुरुवात झाली. याठिकाणी त्यांनी सुमारे अर्धा तास शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यांचे प्रश्न, अडचणी जाणून घेतल्या. 

या वर्षी 1972 पेक्षा भयानक दुष्काळाची परिस्थिती आहे. पावसाळा आणखीन दोन महिन्याने लागणार आहे. अशावेळी पशुधन जगविण्यासाठी शेतकऱ्यांनी परिस्थितीचा धैर्याने सामना करावा असे आवाहन शरद पवार यांनी शेतकऱ्यांना केले. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी मी शासनाकडे पोहोचविण्याचा प्रयत्न करेन. सरकारनेही कुठलेही राजकीय मतभेद न ठेवता शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सढळ हाताने पुढे यावे असेही आवाहन शरद पवार यांनी यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना केले.

यावेळी त्यांच्यासोबत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे , माजी आमदार उषाताई दराडे  जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, रोहित पवार, बाळासाहेब आजबे, महेंद्र गरजे,  शिवाजी राऊत, सतीश शिंदे, मेहबूब शेख यांच्यासह स्थानिक नेते यावेळी त्यांच्या समवेत होते.

Web Title: Farmers should face drought courageously to save pets : Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.