कृषी प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2019 11:50 PM2019-06-09T23:50:06+5:302019-06-09T23:50:24+5:30
तालुक्यातील जरुड येथे रविवारी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचक्रोशील शेतकºयांनी उत्सर्फूतपणे सहभाग घेतला होता.
बीड : तालुक्यातील जरुड येथे रविवारी कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पंचक्रोशील शेतकºयांनी उत्सर्फूतपणे सहभाग घेतला होता. यावेळी सेवानिवृत्त कृषी उपसंचालक गुलाबराव हेंडगे यांनी उपस्थित शेतक-यांना विविध विषयावर मार्गदर्शन केले.
रविवारी जरुड येथील हारकुबाबा देवस्थान सभामंडपात कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. जरुड येथील नितीन काकडे हे पुणे पोलीस दलात कार्यरत आहेत. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकºयांना तंत्रज्ञानाचा वापर करुन शेती कशी करावी तसेच पिकवलेला माल कसा विकावा याची माहिती व्हावी यासाठी कृषी प्रदर्शनाबाबत त्यांनी गावातील तरुण शेतकºयांशी व नागिरकांशी चर्चा केली. त्यानंतर जरुड येथे कृषी प्रदर्शनाचे आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. पंचक्रोशीतील शेतकºयांना माहिती व्हावी यासाठी दोन महिने आधी विविध माध्यमातून प्रचार केला होता. त्यामुळे रविवारच्या कृषी प्रदर्शनात मोठ्या संख्येने शेतकºयांनी सहभाग नोंदवला होता. पुढील काळात मोठ्या स्वरुपाचे प्रदर्शन घेऊन संपूर्ण जिल्ह्यातील शेतक-यांना सहभागी करुन घेण्यात येणार असल्याचे काकडे यांनी सांगितले.
कृषी प्रदर्शत सहभागी २१ शेतकºयांना सोडत पद्धत करुन मोफत फळबाग लागवड करुन देण्यात येणार आहे. तसेच शेतकºयांनी दुष्काळात देखील कष्टाने टिकवलेल्या झाडाची केशर, बंजरंगी व इतर अंब्याचे प्रकार प्रदर्शनात ठेवण्यात आले होते. शेतकºयांनी कमी पाण्यावर जगणाºया व चांगले उत्पन्न असणाºया फळबाग लागवड कराव्यात, यासाठी लिंबु, चिंच, सिताफळ, मोसंबी, पेरु याची रोपांची कमी दरामध्ये विक्री करण्यात आली, तसेच एक-एक रोप मोफत देखील देण्यात आले. पारंपारिक गहू, बाजरी, ज्वारीची बियाणांचा स्टॉल लावण्यात आले होते. तसेच सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली बाजरी, गहू, विविध डाळी देखील प्रदर्शनात ठेवण्यात आल्या होत्या. कृषी प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी नितीन काकडे, विकास काकडे, महादेव काकडे, विष्णू काकडे, तसेच जरुड, वांगी, शिवनी, बाबळखुंटा, पिंपळनेर, येथील तरुणांनी परिश्रम घेतले.