शेतकऱ्यांनी रोखली गेटकेन उसाची वाहने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2018 12:15 AM2018-12-15T00:15:32+5:302018-12-15T00:17:47+5:30

पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे. मात्र, साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा ऊस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस असलेल्या गाड्या शुक्रवारी अडविण्यात आल्या आहेत.

Farmers stop the Gatkane sugarcane vehicles | शेतकऱ्यांनी रोखली गेटकेन उसाची वाहने

शेतकऱ्यांनी रोखली गेटकेन उसाची वाहने

googlenewsNext
ठळक मुद्देकार्यक्षेत्रातील उस गाळप करण्याची शेतक-यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
माजलगाव : पाणी पातळी खालावल्याने उभा ऊस वाळत आहे. मात्र, साखर कारखानदार कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करण्याऐवजी गेटकेनचा ऊस आणत आहेत. त्यामुळे शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करावा या मागणीसाठी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने सोमठाणा येथे राष्ट्रीय महामार्गावर गेटकेनचा ऊस असलेल्या गाड्या शुक्रवारी अडविण्यात आल्या आहेत.
तालुका परिसरात छत्रपती, जय महेश, सुंदरराव सोळंके हे साखर कारखाने आहेत. या तीन कारखान्यांनी कार्यक्षेत्रातील ऊस गाळप केल्यास ऊस गाळपाचा प्रश्न निर्माण होणार नाही. परंतु गेटकेनचा ऊस गाळपास आणल्याने परिसरातील ऊस उभाच राहत आहे. पाण्याअभावी हा ऊस वाळत असून, कारखानदारांनी कार्यक्षेत्रातील उसाचे गाळप होईपर्यंत गेटकेनचा ऊस गाळपास आणू नये या मागणीसाठी गेटकेनचा ऊस येणाºया गाड्या अडवत राष्ट्रीय महामार्गावर सोमठाणा येथे शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गंगाभिषण थावरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकºयांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. याठिकाणी पोलीस निरीक्षक मिर्झा बेग हे दाखल झाले असून, मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात आले आहे.

Web Title: Farmers stop the Gatkane sugarcane vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.