शेतकरी अनुदानावर बँकांकडून डल्ला...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:35 AM2019-05-16T00:35:37+5:302019-05-16T00:37:53+5:30

दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.

Farmers subsidize loans by banks ... | शेतकरी अनुदानावर बँकांकडून डल्ला...

शेतकरी अनुदानावर बँकांकडून डल्ला...

Next
ठळक मुद्देबीड जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा : आदेशाला हरताळ

प्रभात बुडूख।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दुष्काळी परिस्थितीमुळे दोन्ही हंगामातील पिके हातची गेली आहेत. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. खरीप दुष्काळ अनुदान, २०१६ अतिवृष्टी अनुदान, पिक विम्याचे पैसे बँकामध्ये जमा झाले आहेत. मात्र, यामधून कर्जाची रक्कम वळती करुन घेतली जात आहे. तसेच जिल्हा बँकेकडून अनुदान वाटपात हलगर्जीपणा होत आहे.
जिल्हा दुष्काळाच्या खाईत हरपळत असतना शेतकऱ्यांना मिळालेल्या अनुदानाचे पैसे जिल्ह्यातील बँकांकडून कर्जाच्या रकमेमध्ये वळते केले जात आहेत. मिळालेल्या अनुदानामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळेल, अशी आशा असताना बँकाकडून ही रक्कम वळती केली जात असल्यामुळे शेतकºयांमधून संताप व्यक्त केला जात आहे. तर जिल्हा बँकेमध्ये शेतकºयांचे खाते मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी जमा झालेल्या अनुदानाची रक्कम देखील अधिक आहे.
ही रक्कम इतर बँकांमध्ये ठेव स्वरुपात ठेवल्यामुळे शेतकºयांना वेळेवर अनुदान दिले जात नसल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे जिल्हा बँकेत शेतकºयांचे जवळपास ८४५ कोटी रुपये अनुदान अडकले आहे. या दुष्काळी गंभीर परिस्थितीमध्ये शेतकºयांचे हाल होत असताना देखील जिल्हा बँकेकडून हा बनाव केला जात असल्याने संतप्त झालेल्या शेतकºयांनी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाकडून बँकेच्या विरोधात जन आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
तसेच प्रशासनाने देखील या प्रकरणी जिल्हा बँकेची व इतर बँकेची चौकशी करुन योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी शेतकºयांमधून केली जात आहे.
चालू वर्षात ८४५ कोटीचे विमा व अनुदान
सोयाबीनसोडून इतर कापूस,मूग,तूर,उडीद, तीळ यासर इतर पिकांच्या विम्यापोटी ३४६ कोटी ३९ लाख रुपये शेतकºयांच्या खात्यावर जमा झाले आहेत. त्यामुळे ही रक्कम देखील कर्जातून वळती करुन घेतली जाणार असल्याची माहिती आहे.
जिल्हा बँकेककडे यापुर्वीच खरीप दुष्काळी अनुदानापोटी ४२८ कोटी रुपये मार्च महिन्यात वर्ग करण्यात आले आहेत तर २०१६ अतिवृष्टी अनुदानापोटी ६८ कोटी रुपये प्रशासनाकडून बँकेमध्ये जमा करण्यात आले आहेत.
यापैकी राष्ट्रीय कृत बँकेतील अनुदान शेतकºयांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. मात्र, जिल्हा बँकेकडून अनुदानाची रक्कम वाटप करण्यात हलगर्जीपणा केला जात आहे. तसेच इतर बँकेतून कर्जाची रक्कम वळती केली जात आहे.
आरबीआयकडून बँकांना
आदेश देण्याची गरज
कर्जाच्या रकमेमधून अनुदान व विम्याची रक्कम वळती करु नये, असे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आहेत असे विचारले असता, लीड बँकेचे व्यवस्थापक विजय चव्हाण म्हणाले, सर्व राष्ट्रीयकृत बँकाना भारतीय रिर्झंव बँकेने पत्राद्वारे असे आदेश देण्याची आवश्यकता असते, असे पत्र प्राप्त झाल्यानंतर ही रक्कम वळती केली जाणार नाही.

Web Title: Farmers subsidize loans by banks ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.